नागपूर । केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची प्रकृती उत्तम
Sat, 27 Apr 2019-11:50 pm,
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची प्रकृती उत्तम आहे. नागपुरात दाखल झाल्यानंतर गडकरी यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. शिर्डीत एका प्रचारसभेत भाषणादरम्यान गडकरींना भोवळ आली. प्रखर उन्हामुळे गडकरी भाषण थांबवून खाली बसले. गडकरी यांची शिर्डीच्या विमानतळावर डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली.