Video| शिवाजी पार्कात सदस्य नोंदणीसाठी मनसेची प्रभात फेरी
Fri, 26 Aug 2022-9:30 am,
Prabhat Feri at Shivaji Park by MNS to create awareness about mns membership registration drive
मनसेकडून आज मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. सदस्य नोंदणी मोहीम जनजागृतीसाठी मनसेकडून प्रभात फेरी काढण्यात आली. मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक असं म्हणत या प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत सर्वाधिक सदस्य नोंदणी करण्यावर मनसेचा भर आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीनं सदस्य नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात मनसेकडून राबविण्यात येतंय. मुंबई भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी, खड्डे मुक्त करण्यासाठी मनसेमध्ये सहभागी होण्याचं मनसेकडून नागरिकांना आवाहन करण्यात येतंय.