पुणे । पासपोर्ट मॅन ज्ञानेश्वर मुळे लोकसभेच्या आखाड्यात
Thu, 04 Oct 2018-10:30 pm,
पुणे : भारतात पासपोर्ट मॅन म्हणून प्रसिद्ध झालेले देशाचे परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये एका कार्यक्रमात त्यांनी तसे संकेत दिले आहेत. मुळे नेमके कुठल्या पक्षाकडून आणि कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याची चर्चा आता सुरु झालीय. ज्ञानेश्वर मुळे सांगतात, मी पुण्याचा नाही, पण पुण्याशी माझी नाळ जुळलीय. कोल्हापूरच्या माणसाला पुण्यात येऊन फड गाजवल्याशिवाय बरे वाटत नाही. ज्ञानेश्वर मुळे पुण्याचा राजकीय फड गाजवण्याचा तयारीत तर नाहीत ना, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय.