पुणे: पुण्याच्या खराडी येथे सहा जणांना उडवणाऱ्या कारच्या चालकाला पोलिसांनी हुडकून काढले आहे. सौरभ जासूद असे या चालकाचे नाव असून तो पुणे महानगरपालिकेतील एका बड्या अधिकाऱ्याचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात झाला तेव्हा सौरभच्या गाडीत दारूच्या बाटल्या असल्याचेही समजत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नगर रस्त्यावर हा अपघात झाला होता. भरधाव वेगात असलेल्या होंडासिटी कारने सहाजणांना उडवले होते. या अपघातात शांताबाई सोनवणे आणि नयन रमेश मोकळे यांचा मृत्यू झाला होता. तर महेंद्र लोखंडे हे गंभीररित्या जखमी झाले होते.


हा अपघात झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली होती. यावेळी तपासात ही गाडी शशिकांत जासूद यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली. तपासाअंती अपघातावेळी सौरभ ही गाडी चालवत असल्याचे निष्पन्न झाले.  अपघातावेळी त्याच्याबरोबर गाडीत मुली होत्या. तसेच दारुच्या बाटल्या असल्याचेही समजते. 


सौरभचे वडील शशिकांत जासूद हे पुणे महापालिकेच्या वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयात मालमत्ता कर विभागात अधिकारी आहेत.