सातारा: खासदार उदयनराजे भोसले हे नेहमी कोणाची ना कोणाची फिरकी घेत असतात. अशाच एका साताऱ्यातील टपाल कार्यालयातील कार्यक्रमात खा.उदयनराजे भोसले यांनी गिरीश बापट यांना मिश्किल टोले लगावले. यावेळी खा. उदयनराजेंनी गिरीश बापट यांना साताऱ्यातून निवडणूक लढवण्याची ऑफरच देऊन टाकली.


 जर बापट यांनी साताऱ्यातून निवडणूक लढवली तर मी माघार घेईन, असे ते म्हणाले. बालपणी बापट  यांच्या प्रचाराचे बॅनर लावल्याची आठवणही यावेळी त्यांनी सांगितली. 
 
 काही दिवसांपूर्वीच सातारा नगरपरिषदेच्या एका कार्यक्रमादरम्यान उदयनराजेंनी डंपर घेऊन शहरात फेरफटका मारला होता. यावेळी नगराध्यक्ष, नगरसेवकांसह अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच धावपळ उडाली होती.