कोल्हापूर: दुधाच्या अनुदानावरुन दूध व्यावसायिक संघ आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. सरकारने दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान घोषित केले आहे. मात्र, ते अनुदान दुध संघांना मिळाले नसल्याने पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारला येत्या ६ तारखेपर्यंत अनुदानासाठी अल्टीमेटम देण्यात आलाय. अन्यथा अकरा तारखेपासून पंचवीस रुपयाने दुध खरेदी बंद करण्याचा इशारा दुध व्यावसायिक संघांनी दिला आहे.


सरकार अनुदान देण्यास चालढकल करत असल्याचा आरोपही दुध संघांनी केला. दुधाच्या थकीत अनुदानासंदर्भात शनिवारी पुण्यात दुध उत्पादक प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची आणि विभागीय दुग्ध विकास अधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीला गोकूळ, वारणा, राजारामबापू, डायनॉमीक्स, सोनाईसह अनेक दुध उत्पादक संघांनी हजेरी लावली होती. 


सरकारकडं पन्नास दिवसाचं साधारण 180 कोटी अनुदान थकले आहे. माञ, सरकार ते देण्याबाबत सरकार चालढकल करीत असल्याचा आरोप दुध व्यावसायिक संघांनी केला आहे.