पुणे: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी समीर गायकवाडला गेल्यावर्षी सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता. या अटींचे नियमित पालन केल्याने आता समीर गायकवाडवरील निर्बंध उठवण्यात यावेत, अशी मागणी गुरुवारी त्याच्या वकिलांकडून करण्यात आली. 


मात्र, सरकारी वकील अनुपस्थित असल्याने या अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. समीर गायकवाडच्या वकिलांनी समीरची पत्नी गर्भवती असल्याने तसेच तिच्या सोबत काळजी घेण्यासाठी कोणीच नसल्याने समीरला पत्नीसोबत थांबणं गरजेचे असल्याचे वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे न्यायालयाने या अटी शिथिल कराव्यात अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 सप्टेंबरला होणार आहे.