पुणे : राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर झाले. आगामी वर्षात फेब्रुवारी ते मार्च दरम्यान या परीक्षा होतील. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ या कालावधीत होईल. दहावीची परीक्षा १ मार्च ते २२ मार्च २०१९ या कालावधीत होणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद. कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत या परीक्षा घेण्यात येणार आहेत. लवकरच प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा, तोंडी व अन्य परीक्षांचं वेळापत्रक स्वतंत्रपणे शाळांना कळवण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही परीक्षांचे विस्तृत वेळापत्रक www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. संकेतस्थळावरील वेळापत्रक हे केवळ माहितीसाठी आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल, असे शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. 


वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरुपात पाठवाव्यात असे आवाहन मंडळाने केले आहे.