पुणे: 'स्टॉप द व्ही रायच्युएल'च्या माध्यमातून कंजारभाट कौमार्य चाचणीच्या विरोधात लढा देणाऱ्या एका महिलेला या समाजातील तथाकथित समाजरक्षकांच्या रोषाला पुन्हा सामोरे जावे लागले आहे.  ऐश्वर्या भाट-तामचीकर असे या महिलेचे नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही महिला पिंपरी येथील भटनगरमध्ये कंजारभाट समाजाच्या वतीने आयोजित गरबामध्ये सहभागी होण्यासाठी गेली होती. सुरुवातीला ती इतर महिलांसोबत गरबा खेळत होती. मात्र, ऐश्वर्या तिथे आल्याची बाब लक्षात येताच आयोजकांनी गरबा थांबवला. 


ऐश्वर्या तिथून निघेपर्यंत आयोजकांनी गरब्याऐवजी डीजे वाजवणे पसंत केले. त्यामुळे ऐश्वर्याने थेट पोलिसांकडे जाऊन याबाबत तक्रार केली.


कौमार्य चाचणीच्या अनिष्ट प्रथेविरोधात काम करत असल्यामुळे आपल्यावर बहिष्कार टाकण्यात आल्याचा या महिलेचा आरोप आहे. 



याविरोधात पोलिसांनी आठ जणांविरोधात सामाजिक बहिष्कार कायद्याच्या कलमाखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.