भारतात Corona New Strainचा कहर, पुण्यात 20 नवीन रुग्ण सापडले; संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 58
ब्रिटनपासून सुरू झालेल्या कोरोनाव्हायरसच्या नवीन स्ट्रेनचा संसर्ग (Corona New Strain) भारतात सतत वाढत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
मुंबई : ब्रिटनपासून सुरू झालेल्या कोरोनाव्हायरसच्या नवीन स्ट्रेनचा संसर्ग (Corona New Strain) भारतात सतत वाढत आहेत आणि एनआयव्ही पुणे लॅबमध्ये 20 नवीन घटना समोर आल्या आहेत. यानंतर, भारतातील नवीन कोरोना स्ट्रेनची (New Corona Strain in India) संख्या 58 वर पोहोचली आहे.
1.03 कोटींवर नवीन कोरोना संसर्गाची संख्या
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात देशभरात कोरोनाव्हायरसचे (Coronavirus) 16375 नवीन रुग्ण आढळले आणि 201 रुग्णांचा मृत्यू झाला. यानंतर, संक्रमित होणा ऱ्यांची एकूण संख्या 1,03,56,844 वर पोहोचली, तर देशभरात आतापर्यंत 1,49,850 लोक मरण पावले आहेत.
भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 96.32 टक्के
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 29,091 रूग्ण बरे झाले, त्यानंतर बरे झालेल्या लोकांची संख्या 99,75,958 झाली. देशात बरे होण्याचा दर 96.32 टक्क्यांवर पोहोचली आहे. तर मृत्यूचा दर 1.45 टक्क्यांवर आहे. देशात कोविड-19चे 2.31,036 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.
ब्रिटनला जाणाऱ्या विमानांवर निर्बंध
नवीन स्ट्रेन रुग्णांचा आकडा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने 23 डिसेंबरपासून ब्रिटनकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. विमानाच्या उड्डाणला प्रथम 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंदी घालण्यात आली होती, नंतर ती 7 जानेवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आली. या अहवालानुसार 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात ब्रिटनहून सुमारे 33 हजार प्रवासी भारतात आले होते.
कोणत्या देशांत नवीन कोरोनाचा स्ट्रेन आहे?
कोरोनाच्या (Coronavirus) नवीन विषाणूचा प्रसार हा प्रथम ब्रिटनमध्ये आढळून आला. त्यानंतर नवीन स्ट्रेन हा अनेक देशांमध्ये पसरला आहे. यूके, भारत, अमेरिका, चीन, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, फ्रान्स, डेन्मार्क, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, लेबनॉन, सिंगापूर आणि नायजेरियात आतापर्यंत नवीन स्ट्रेन सापडला आहे. त्याशिवाय दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा एक नवीन स्ट्रेन सापडला आहे, जो ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या स्ट्रेनपेक्षा वेगळा आहे.