शिर्डी : राज्यात कोरोना संसर्ग वाढतोय. सर्वच क्षेत्रातील संस्था रुग्णसेवेसाठी पुढाकार घेत आहेत. त्यात राज्यातील सर्वात श्रीमंत असे शिर्डीचे साईबाबा संस्थान तरी कसे मागे राहणार? साईबाबा संस्थानच्या साई आश्रममध्ये तब्बल ४२०० बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिर्डीच्या साईबाबा संस्थानाने अहमदनगर जिल्ह्यासाठी दिलासादायक माहिती दिली आहे.  साईबाबा संस्थानाच्या वतीने तब्बल ४२०० बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारण्याची घोषणा केली आहे.


या कोविड सेंटरमध्ये ४२००बेड,  १००० ऑक्सिजन, २८० आयसीयु बेड असणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि विधि कार्यालयाकडून शिर्डीत जम्बो कोविड सेंटर उभारण्याची परवानगी मिळाली आहे.


या जम्बो कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना मोफत उपचार देण्यात येणार आहेत.


------------------------------


अहमदनगर कोरोना अपडेट


दिनांक ०७ मे, २०२१


आज नव्या ४५९४ बाधितांची रुग्ण संख्येत भर


तर ३८५६ रूग्णांना डिस्चार्ज  


उपचार सुरू असलेले रूग्ण:२७००९


एकूण रूग्ण संख्या:२,०२,३७५


बरे झालेली रुग्ण संख्या:१,७३,१०४


गेल्या २४ तासात मृत्यू: ५६


एकूण मृत्यू:२२६२