बगाड यात्रेचं आयोजन भोवलं! गावकऱ्यांना घेतलं ताब्यात; अनेकांवर गुन्हे
साताऱ्यातील बसवत बावधनमध्ये बगाड यांत्रेचं आयोजन करण्यात आले होते.
सातारा : राज्यात कोरोना संसर्गाचा हाहाकार सुरू असूनही काही जिल्ह्यांमध्ये कोरोन प्रतिबंध नियमांचे पालन न होत असल्याचे दिसून येत आहे. साताऱ्यातील बसवत बावधनमध्ये बगाड यांत्रेचं आयोजन करण्यात आले होते. या यात्रेतील प्रचंड गर्दीने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले होते. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
साताऱ्यात बसवत बावधनमध्ये कोरोना नियमांना धाब्यावर बसवत बगाड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात्रेतील प्रचंड गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बगाड यात्रा काढू नये असे आदेश असताना देखील यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे आता बगाड यात्रा भरवल्या प्रकरणी 2500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाई पोलीस ठाण्यात आतापर्यंत 83 गावकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून बगाड यात्रेचं लौकिक आहे. मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी करत बगाड काढले आहे.