पुणे: पुण्यातील बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लबच्या इमारतीला सोमवारी आग लागली. इमारतीतून आगीचे लोट येत असून अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आग विझविण्याचे आग युद्धपातळीवर सुरु आहे. बाणेर परिसरात पॅनकार्ड क्लबमध्ये राहण्यासाठी हॉटेल्ससोबतच सर्व सुविधा आहेत. या इमारतीच्या तळमजल्यावर बार आणि रेस्टॉरंट आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राथमिक माहितीनुसार, दुपारी साधारण एकच्या सुमारास इमारतीच्या डोमला आग लागली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चहुबाजूने आग विझविण्यास सुरुवात केली. आगीमुळे दूर अंतरावरून देखील धुराचे लोट दिसत आहेत. डोम उंचावर असल्यामुळे त्याला आगीने वेढले आहे. आगीची तीव्रता जास्त असल्याने जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत.