Devi Singh Shekhawat Death : गेल्या दोन दिवसांपासून माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (Former President Pratibhatai Patil) यांचे पती देवीसिंग शेखावत (Devi Singh Shekhawat) यांची तब्येत खालावली होती. हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्यानंतर त्यांना ही समस्या जाणवू लागली होती. अशातच आता त्यांच्या निधनाची माहिती (Devi Singh Shekhawat Passes Away) समोर आली आहे. पुण्यातील केईएम (KEM) रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे निधन झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या 89 व्या वर्षी देवीसिंग शेखावत यांनी अखेरचा श्वास घेतला.  उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत (Devi Singh Shekhawat Death) मालवली. आज सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्‍या काही वर्षांपासून ते पुण्‍यात (Pune News) वास्‍तव्‍याला होते. मात्र, दोन दिवसापू्र्वी अचानक त्याचा हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला.


कोण होते Devi Singh Shekhawat?


अमरावतीचे प्रथम महापौर म्हणून शेखावत (Devi Singh Shekhawat) यांची ओळख होती. विद्याभारती शिक्षण संस्‍थेचे संस्‍थापक अध्‍यक्ष ते माजी राष्‍ट्रपती प्रतिभाताई पाटील (Pratibhatai Patil) यांचे पती अशी ओळख त्यांची सर्वदूर पसरली. कॉंग्रेस पक्षात सक्रीय सदस्‍य असलेल्या देवीसिंह हे 1991 मध्‍ये अमरावतीचे प्रथम महापौर बनले. 1985 साली अमरावती विधानसभा मतदार संघातून निवडून आलेल्या देवीसिंह यांना विधानसभेच्‍या निवडणुकीत जिंकता आलं नाही.


निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर त्यांनी राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला. 7 जुलै 1965 रोजी त्यांचा विवाह पार पडला. राजस्थानच्या राज्यपालपदी ज्यावेळी प्रतिभा पाटील यांची नियुक्ती झाली. त्यावेळी दोघेही जयपूर राजभवनात राहत होते. त्यानंतर 2007 साली प्रतिभा पाटील राष्ट्रपती झाल्या. त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास सुरू ठेवला. अशातच त्यांच्या निधनाची बातमी आल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.