आजी-आजोबांसाठी नातवंड म्हणजे दुधावरची साय असते. हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. अवघ्या 10 महिन्यांची चिमुरडी दुर्मिळ आजाराने ग्रस्त. धक्कादायक म्हणजे या आजारामध्ये फक्त बाळाचे आयुष्य दोन वर्ष इतकेच असते. अनेक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. यावेळी यकृत प्रत्यारोपण हा एकच पर्याय असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यावेळी मागचा पुढचा कोणताही विचार न करता आजोबांनी यकृताचा काही भाग दाण करण्यासाठी पुढे सरसावले आणि 10 महिन्यांच्या चिमुकलीला जीवनदान मिळाले. 


बाळ 'या' आजाराने ग्रस्त 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

10 महिन्यांच्या बाळाला क्रिग्लर-नाजर सिंड्रोम (Crigler-Najjar Syndrome) हा जीवघेणा आजार होता. हा आजार अतिशय दुर्मिळ असून 1 दशलक्ष मुलांपैकी एका मुलात आढळून येतो. या आजाराची धक्कादायक बाब म्हणजे हा आजार घेऊन जन्माला आलेल्या बाळाचे आयुष्य अवघे दोन वर्षांचे असते असेही डॉक्टरांनी सांगितले.
नागपूर शहरातील किम्स किंग्सवे हॉस्पिटलमध्ये (Kims Kingsway Hospita) दहा महिन्याच्या बाळावर यशस्वी प्रत्यारोपण झाले. एक जीवघेणा अनुवंशिक आजार घेऊन चिमुकली जन्माला आली. 


काय आहे आजाराची लक्षणे


काविळमुळे यकृताचा रंग फिकट झाला होता. प्रकृती हळूहळू खालावत होती. चिमुकलीला क्रिग्लर-नाजर सिंड्रोम हा जीवघेणा आजार होता. हा आजार अतिशय दुर्मिळ असून 1 दशलक्ष मुलांपैकी एका मुलात आढळून येतो. यकृत दान करुन तिच्या यकृताला पित्त खंडित होण्यापासून रोखले गेले.


आई-बाबा नाही तर आजोबांनी दिलं जीवनदान 


आईचा रक्‍तगट जुळला नाही तर वडील प्रत्यारोपणासाठी सक्षम नव्हते. अशा परिस्थितीत नेमकं काय करावं कुणालाच कळत नव्हतं. हा यक्ष प्रश्न आजोबांना उभा ठाकला. यावेळी आजोबांनी कशाचीही पर्वा न करता यकृताचा काही भाग दान करण्यासाठी पुढे आले. नागपूरच्या किम्स- किंग्सवे हॉस्पिटलमध्ये जिवंत दात्याचे यकृत प्रत्यारोपण केले. अवघ्या 6.4 किलो वजनाच्या 10 महिन्यांच्या बाळावर हा प्रयोग अत्यंत आव्हानात्मक होता.