पुणे: राजकीय फटकेबाजी आणि बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पुण्यातील एका कार्यक्रमात केलेल्या टिप्पणीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गडकरी यांनी एका बैठकीतील किस्सा सांगितला. देशभरातील उद्योगांचे धोरण ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीत सेक्रेटरीने भारतात आयात होणाऱ्या वस्तूंबद्दल माहिती दिली. आपण चीनमधून उदबत्तीपासून ते प्लॅस्टिकच्या चमच्यांपर्यंत अनेक गोष्टी आयात करतो, असे त्यांनी सांगितले. तेव्हा मी सेक्रेटरीला म्हटलं की, 'अपने हिंदुस्थान में चमचो की भी कमी पड गई क्या?' गडकरी यांच्या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला. 


क्रिकेट आणि राजकारणात काहीही घडू शकतं- गडकरी


या कार्यक्रमात गडकरींनी भविष्यात उद्योगांचे विकेंद्रीकरण होण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. मुंबईबाहेर उद्योग वाढतील यासाठीची योजना सरकारने आखली आहे. कृषी, आदिवासी तसेच ग्रामीण क्षेत्राला डोळ्यासमोर ठेवून नवनवीन तंत्रज्ञान विकसित होणे आवश्यक आहे. पुढील साडेतीन वर्षांत दिल्ली-मुंबई हायवेचे काम पूर्ण होईल. त्यानंतर १३ ते १४ तासांत हे अंतर पार करता येणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. तसेच राज्यात १०० नवीन विमानतळ उभारले जात आहेत. या सगळ्यातून औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल, असा विश्वासही यावेळी गडकरी यांनी व्यक्त केला.


संजय राऊतांच्या वाढत्या वयाप्रमाणे परिपक्वताही वाढावी - शेलार