Pune News Today: पुण्यातील हवेली तालुक्यातील मौजे वडगाव येथे बिबट्यांच्या नखांचे गळ्यातील लॉकेट तयार करण्यासाठी मृत बिबट्याचा पंजा कापून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांवर वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे, आरोपी मुलांनी बिबट्याच्या पायाची नखे देखील तोडली आहेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनपरिक्षेत्र पुणे अंतर्गत हवेली तालुक्यातील मौजे वडगाव शिंदे येथे नवनाथ खांदवे यांच्या शेतात ८ फेब्रुवारी रोजी बिबट्याचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली. या ठिकाणी मादी बिबट ही मृत अवस्थेत आढळली. या मादी बिबट्याचे वय अंदाजे १० महिने होते. दरम्यान, वणविभाने तपासणी केली असता, ३ नखे आणि एक पंजा कापून नेला असल्याचे लक्षात आले.


वनविभागाने मृत बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन ९ फेब्रुवारी रोजी शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालानुसार, बिबत्याचा मृत्यू हा कुत्र्यांच्या हल्ल्यात झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, त्याचा पंजा आणि नखे कापून नेल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करून वन कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन श्वान पथकच्या साहाय्याने तपास सुरू केला


ऊसतोडणी मजूर यांच्याकडे चौकशी केली असता एका अल्पवयीन मुलाने वडिलांच्या व सोबतच्या २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने मृत बिबट्याचे ३ नखे व पायाचा पंजा व त्याचे १ नख अशी एकूण ४ नखे कोयता व सुरीच्या साहाय्याने कापून लपवून ठेवल्याचे सांगितले. तसेच बिबटच्या नखाचे गळ्यातील लॉकेट बनविण्याचे उद्देशाने आकर्षणापोटी गुन्हा केल्याचे सांगितले.


दरम्यान, पारनेर तालुक्यातील पिंपरीजलसेन येथे मानवी वस्तीमधे बिबट्याचा मुक्त संचार सुरु असून मागील आठ दिवसामधे अनेक पाळीव प्राणी व जनावरांवर बिबट्याने हल्ले केले आहेत. कदम वस्तीवर चंद्रकांत कदम या शेतकर्‍याच्या घरासमोर सलग दोन दिवसांत बिबट्याने त्यांचा कुत्रा आणि दोन कोंबड्यांचा फडशा पाडला आहे. पहिल्या दिवशी पहाटे ४ वाजता घरासमोर बसलेल्या कुत्र्यावर हल्ला केल्यामुळे कुत्रा ठार झाला. तर, दूसर्‍या दिवशी रात्री ११च्या दरम्यान दोन कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या आहेत. गाईवरही बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र घरातील व्यक्ती जनावरांचा आवाज एकून सतर्क झाल्यामुळे बिबट्या पसार झाला. ही सर्व घटना सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. अशा अनेक घटना पिंपरी जलसेनमधे वारंवार घडत असल्यामुळे सध्या येथील नागरीकांमधे भितीचे वातावरण पसरले आहे. सध्या जनावरे व पाळीव प्राण्यांवर हल्ले होतात. पुढे माणसांवरही हल्ले होवू शकतात. वनविभागाने सदर बिबट्याचा ताबडतोब बंदोवस्त करावा, अशी मागणी शेतकरी चंद्रकांत कदम यांनी केली आहे.