Pune Water Supply: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुण्यात 17 ऑक्टोबरला म्हणजे येत्या गुरुवारी पुणे शहर आणि उपनगरातील संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत विषयक आणि देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. या कामामुळं संपूर्ण पुणे शहर तसेच उपनगरांचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी बंद राहणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देखभाल दुरुस्तीच्या कामामुळं दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 18 ऑक्टोबर रोजी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असं अवाहन पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केलं आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील कामे एका दिवसातच पूर्ण करण्याचा प्रयत्न  केला जाणार आहे, असं पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 


शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, रोहन कृतिका, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, सॅलेसबरी पार्क, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, कोंढवा खुर्द, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परीसर, धनकवडी परीसर, गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ


लष्कर जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग : हडपसर परिसर, सातववाडी, ससाणे नगर, काळे पडळ, बी.टी-कवडे रोड, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, वानवडी, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, काळेपडळ, हांडेवाडी रोड, महमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, लुल्लानगर, पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी, शेवाळवाडी, खराडी, वडगाव शेरी, संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एनआयतीएम रोड, रेसकोर्स, लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा


वडगाव जलकेंद्र परीसर : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, आंबेडकरनगर, दाते बस स्टॉप परिसर.


एस.एन.डी.टी. (पाण्याची टाकी) : गोखलेनगर, औध, बोपोडी, पुणे विद्यापीठ, लॉ कॉलेज रोड, महाबळेश्वर हॉटेल पर्यंत बाणेर रोड, बीएमसीसी कॉलेज रोड, भोसलेनगर, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, पौड रोड, भीमनगर, वेदांतनगरी, करिष्मा सोसायटी समोरील परिसर, मयुर कॉलनी परिसर, दशभुजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत, मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकीलनगर, गिरीजा शंकर, नवसह्याद्री, ताथवडे उद्यान परिसर, निलकमल युनायटेड वेस्टर्न


चांदणी चौक टाकी परिसर : पाषाण, भूगाव रोड, कोकाटे वस्ती, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीनगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, सुस रोड.