बेदुणे साडे चार ते खट्टा मिठा..'हे' आहेत अतुल परचुरे यांचे गाजलेले चित्रपट

| Oct 14, 2024, 20:51 PM IST
1/8

अतुल परचुरे यांनी टीव्ही, नाटक ते चित्रपट सगळ्यात काम केले. ते हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत मोठया-छोट्या पडद्यावर अधिक सक्रिय होते.

2/8

अतुल परचुरे महाविद्यालयीन काळातच ते थिएटरशी जोडले गेले. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी नाटकं केली आणि लवकरच छोट्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली.   

3/8

ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. ते 57 वर्षांचे होते. मराठीसह हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारे अतुल परचुरे यांनी कॅन्सरशी लढा दिला होता. 

4/8

तुझ्या विन मर जावां

एक महाराष्ट्रीयन मुलगा एका पंजाबी मुलीच्या प्रेमात पडतो आणि ते दोघे रिलेशनशिपमध्ये येतात. पण दोघांना लग्न करण्यासाठी घरच्यांना तयार करण्यासाठी फार प्रयत्न करावे ;लागतात. या चित्रपटात अतुल परचुरे यांनी बंदु मामा नावाची भूमिका केली होती. 

5/8

धटिंग धिंगाणा

अंकुश चौधरी, वंदना गुप्ते, अरुण नलावडे, प्रसाद ओक अशी भली मोठी स्टार कास्ट असलेल्या कॉमेडी कथानक असलेल्या चित्रपटात अतुल परचुरे यांनी पोलिसांची भूमिका केली होती.   

6/8

आवारापन

आवारापन  हा 2007 चा हिंदी भाषेतील ॲक्शन क्राईम चित्रपट आहे[. मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटात अतुल परचुरे आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसले. सिद्धार्थ सूद असं त्यांच्या भूमिकेचे नाव होते. 

7/8

खट्टा मिठा

अक्षय कुमार याचा कॉमेडी सिनेमा खट्टा मिठामध्येही अतुल परचुरे यांनी भूमिका केली होती. 

8/8

बेदुणे साडे चार

या चितपटात एका पुरुषाला २ बायका असतात आणि एकाला दुसऱ्याबद्दल माहिती नसते. याच्या परिणामी माणसासोबत निर्माण होणाऱ्या गमतीशीर प्रसंग या चित्रपटात दाखवले आहेत. या चित्रपटातून अतुल परचुरे यांनी सगळ्यांना खूप हसवले.