7 एअरबॅग, 5 स्टार सेफ्टी; 'या' SUV च्या विक्रीत तब्बल 200 टक्क्यांनी वाढ; खरेदीसाठी भारतीयांच्या उड्या

गेल्या सप्टेंबर महिन्यात कंपनीच्या अशाच एका 5 स्टार सेफ्टी रेटिंग एसयुव्हीने आपल्या विक्रीने  सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. अचानक कारच्या विक्रीत 200 टक्क्यांची वाढ झाली.     

| Oct 14, 2024, 19:01 PM IST

गेल्या सप्टेंबर महिन्यात कंपनीच्या अशाच एका 5 स्टार सेफ्टी रेटिंग एसयुव्हीने आपल्या विक्रीने  सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. अचानक कारच्या विक्रीत 200 टक्क्यांची वाढ झाली. 

1/10

सुरक्षा आणि सर्वोत्तम रेटिंग असणाऱ्या कारचा विषय येतो तेव्हा टाटा मोटर्स पहिल्या स्थानावर असते. कंपनीच्या पोर्टफोलिओत सर्वात जास्त हाय-सेफ्टी रेटिंग कार आहेत.   

2/10

गेल्या सप्टेंबर महिन्यात कंपनीच्या अशाच एका 5 स्टार सेफ्टी रेटिंग एसयुव्हीने आपल्या विक्रीने  सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. अचानक कारच्या विक्रीत 200 टक्क्यांची वाढ झाली.   

3/10

आपण इथे Tata Safari बद्दल बोलत आहोत. NCAP च्या क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग मिळवलेल्या या एसयुव्हीची किंमत 16.19 लाखांपासून सुरु होते.   

4/10

सप्टेंबर महिन्यात या एसयुव्हीच्या 1644 युनिट्सची विक्री झाली आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या 516 युनिट्सच्या तुलनेत ही 219 टक्के जास्त आहे.   

5/10

टाटा सफारी हे नाव टाटा मोटर्स फार महत्त्वाचं आहे. 26 वर्षांपूर्वी 1998 मध्ये जेव्हा फर्स्ट मॉडेलला लाँच केलं होतं, तेव्हापासून ही एसयुव्ही भारतीयांमध्ये लोकप्रिय आहे.   

6/10

या एसयुव्हीचं सेकंड जनरेशन मॉडेल 2021 पासून विकलं जात आहे, जे 2.0 लीटर डिझेल इंजिनसह येतं. ही एसयुव्ही 6-सीटर आणि 7 सीटर अशा दोन प्रकारात उपलब्ध आहे.   

7/10

सामान्यपणे या एसयुव्हीचं मॅन्यूअल ट्रान्समिशन 15 किमी आणि ऑटोमॅटिक व्हेरियंट 25 किमीचा मायलेज देते.   

8/10

या एसयुव्हीमध्ये 12.3 इंचांचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, 10.25 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 10 स्पीकर वाला JBL साऊंड सिस्टम आणि वायरलेस फोन चार्जर मिळतो.   

9/10

NCAP टेस्टमध्ये एडल्ट सेफ्टीत या एसयुव्हीला 32 पैकी 30.8 गुण मिळाले आहेत. तर लहान मुलांच्या सुरक्षेत 49 पैकी 44.54 गुण मिळाले.   

10/10

यामध्ये 7 एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल असिस्ट, 360 डिग्री कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम हे फिचर मिळतात.