सांगली : संपूर्ण देशात महाराष्ट्राचं राजकारण सुसंस्कृत आणि सभ्यतेसाठी ओळखलं जातं. त्याचं श्रेय अनेक सुसंस्कृत राजकीय नेत्यांना जातं. त्या नेत्यांनी कायमस्वरूपी लोकांच्या मनात घर केलंय. असंच एक व्यक्तीमत्व होतं ते म्हणजे दिवंगत नेते माजी गृहमंत्री आर.आर. पाटील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर. आर. आबांच्या मुलाने सुद्धा वडिलांचा वारसा पुढे चालवला आहे. काल ते सांगलीतील तासगावमध्ये असताना एका आजीने रोहित पाटीलला दिलेला हक्काने केलेल्या सूचना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.


दिवंगत आर आर पाटील यांचे चिरंजिव रोहित पाटील सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये असताना. त्यांना वाटेत दोन आजी भेटल्या. रोहित यांनी आजींची मायेने विचारपूस केली. 



उलटफेर, आजीनेच रोहित यांना मायेने आणि हक्काने काही सल्ले दिले तर काही सूचना केल्या. आजीबाईंच्या या हक्काने दिलेल्या सूचनांचा रोहित यांनीही प्रेमाने आणि आपुलकीने स्विकार करीत आशिर्वाद घेतले. 


हा व्हिडिओ रोहित यांनी आपल्या सोशलमीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. त्या व्हिडिओला कॅप्शन देत ते म्हणतात की, 'तासगाव येथे असताना या आज्जी भेटल्या. त्यांनी दिलेल हे प्रेम आणि ठेवलेला विश्वास नक्कीच सार्थ करेन.'


आजींनी केलेल्या सूचना आणि मायेने दिलेल्या आशिर्वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांना हा व्हिडिओ शेअर केला आहे. 


रोहित तरूण नेते आहेत तसेच त्यांच्या विचार आणि वागणूकीवरही वडिलांची छाप दिसते. अशी प्रतिक्रिया अनेक नेटकरी देत आहेत.