मुंबई : प्रत्येक ऋतूत आहारात बदल करणे आवश्यक आहे, थंडीतही आहारात बदल करणे आवश्यक आहे. यामुळे शरीरात व्हिटॅमिन, फायबर उपलब्ध होण्यास मदत होते, पचनक्रिया सुधारते, रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढते. तर पाहुया थंडीत कोणता प्रकारचा आहार योग्य आहे.


बाजरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाजरीमध्ये सर्वात जास्त प्रोटीनचे प्रमाण असते. बाजरीमध्ये शरीरासाठी आवश्यक मॅग्नेशियम, कॅल्शियम, मॅग्नीज, ट्रिप्टोफेन, फायबर, व्हिटॅमिन- बी, अँटीआक्सीडेंटचे प्रमाण भरपूर असते.थंडीच्या दिवसांमध्ये बाजरीची भाकरी खावी. लहान मुलांना बाजरीची भाकरी खाऊ घालावी. 


शेंगदाणा


यामध्ये उपलब्ध असलेले अँटीऑक्सीडेंट, व्हिटॅमिन, मिनिरल्स आदी तत्त्व फायदेशीर ठरतात. शेंगदाण्यामध्ये लोह, कॅल्शिअम आणि झिंकचा उत्तम स्रोत आहे. मुठभर शेंगदाण्यामध्ये ४२६ कॅलरीज, ५ ग्रॅम कार्बोहायड्रेट, १७ ग्रॅम प्रोटीन असते. यामध्ये व्हिटॅमिन इ, के, आणि बी ६ भरपूर प्रमाणात असते. 


मध


शरीराला निरोगी, स्वस्थ आणि ऊर्जावान ठेवण्यासाठी मधाचे सेवन आरोग्यदायी आहे. हिवाळ्यात मधाचा आरोग्याला फायदा होतो. मधामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊन रोग प्रतिकारक शक्तीही वाढते. 


आले


आलं उत्तम पाचक असल्याने पोटदुखी आणि अॅसिडिटीची समस्या दूर होण्यास मदत होते. शेंगदाणे, नेहमीच्या आहारात आले वापरल्यास छोट्या-मोठ्या आजारांपासून दूर राहणे शक्य आहे. हिवाळ्यात कोणत्याही स्वरुपातील आल्याचे सेवन केल्यास त्याचा फायदा होतो. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि डायजेशनही चांगले राहते.


बदाम


हृदय आणि रक्त धमन्या  सुरक्षित बदाम उपयुक्त ठरतो. बदामात असलेले ६५ टक्के मोनोसॅच्युरेटेड फॅट शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते. बदाम सालीसकट खाल्ल्यास ते जास्त पौष्टीक असतात. बदामात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी आणि फायबर उपलब्ध असते. बदामात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने महिलांनी याचे सेवन करणे फायद्याचे असते.