मुंबई : योनीमार्गाच्या आरोग्याविषयी महिलांच्या मनात अनेक प्रश्न असतात. योनीचं आरोग्य निरोगी कसं ठेवावं? सतत डिस्चार्ज होणं योग्य असतं का? असे प्रश्न महिला खुलेपणाने विचारत नाहीत. योनीची स्वच्छता आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ज्याबदद्ल महिलांना माहिती असणं फार गरजेचं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्हाला योनीमार्गाचं आरोग्य चांगलं राखायचं असेल तर या 3 गोष्टींची तपासणी करावी


वजायनल पीएच


नैसर्गिकरीत्या योनीचा pH बॅक्टेरिया, वायरस किंवा बुरशीमुळे होणारे सर्व प्रकारचे सूक्ष्मजीव संक्रमण टाळण्यास सक्षम आहेत. त्यामुळे त्याचा समतोल राखणं 
आवश्यक आहे.


डोडरलीन बॅक्टेरिया


हा एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे जो नैसर्गिकरित्या योनीमार्गात असतो. हा बॅक्टेरिया योनीमार्गातून इन्फेक्शन होण्यापासून रोखू शकतो. ते योनीच्या प्रतिकारशक्तीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.


वजायनल मॉयश्चर


योनीमार्गात मॉयश्चरचं प्रमाण संतुलित ठेवणं महत्त्वाचं असतं. जर योनीमार्गात मॉयश्चरचं प्रमाण कमी असेल तर योनीमधून स्राव येणं, खाज येणं, त्वचा कोरडी होणं, सूज येणं अशा समस्या समोर येतात.