केंटुकी : ही बातमी आहे एका ग्रेट आईची आणि एका ग्रेट डॉक्टरची ... अमेरिकेतल्या केंटुकी राज्यातली ही घटना. एका आईला प्रसूतीवेदना सुरू झाल्या असतानाही तिनं आधी कर्तव्याला प्राधान्य दिलं आणि दुस-या महिलेची प्रसूती केली आणि नंतर स्वतःच्या मुलीला जन्म दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. अर्माडा हेस या स्वतः त्यांच्या दुस-या बाळाला जन्म देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होत्या... त्यांना प्रसूतीवेदनाही सुरू झाल्या होत्या. दुसरे डॉ़क्टर हॉस्पिटलमध्ये आले नव्हते... तेवढ्यात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेली दुसरी महिला हॅलिडे जॉनसन हिलाही प्रसूतीकळा सुरू झाल्या. 


महत्त्वाचं म्हणजे हॅलिडेच्या गर्भात असलेल्या बाळाची नाळ त्याच्या गळ्याभोवती गुंडाळली गेली होती....त्यामुळे हॅलिडेचं सिझेरियन करुन बाळाला तातडीनं वाचवायची गरज होती.  


डॉ.अर्माडाला हे समजलं... तिला स्वतःला प्रसूतीवेदना सुरू होऊनही ती हॅलिडेच्या मदतीला गेली...तिनं पटकन सर्जरी गाऊन चढवला आणि हॅलिडेची यशस्वी प्रसूती केली.... त्यानंतर डॉ.अर्माडा स्वतः लेबर रुममध्ये गेली आणि तिनं एका मुलीला जन्म दिला. डॉ.अर्माडा गर्भवती असताना अगदी प्रसूतीच्या आदल्या दिवसापर्यंत दुस-या महिलांच्या प्रसूती करत होती.... पण प्रसूतीच्या अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत डॉक्टर म्हणून काम करणारी अर्माडा ही जगातली एकमेव डॉक्टर असावी....