नवी दिल्ली : फॉर्ब्स मॅगझीनने जगातील प्रभावी महिलांची यादी जाहीर केली आहे. यात पेप्स‍िकोच्या सीईओ इंदिरा नूई, आयसीआयसीआय बँकेच्या चेअरमन चंदा कोचर यांच्यासोबत इतर भारतीय महिलांनी वर्णी लावली आहे. पेप्स‍िकोच्या सीईओ  इंदिरा नूई यांना या यादीत ११ वे स्थान मिळाले आहे. तर चाड कोचर यांना ३२ वे स्थान आहे. विशेष म्हणजे प्रथमच अभिनेत्री प्रियंका चोप्राने या यादीत स्थान मिळवले आहे. जगातील १०० सर्वाधिक प्रभावी महिलांच्या यादीत प्रियंकाने स्थान पटकावले आहे. यात प्रियंकाचा क्रमांक ९७ वा आहे. तर जर्मनीच्या चॅन्सलर एंगेला मर्केल या प्रथमस्थानी आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंदा कोचर यांना यावर्षीच 'वूड्रो विल्सन अवॉर्ड फॉर ग्लोबल सिटिजनशिप' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. चंदा कोचर यांच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या ICICI डिजिटल व्हिलेज प्रोग्रॅम १७ राज्यातील ११००० ग्रामीण लोकांना ट्रेनिन्ग दिली जाते. या वर्षाअखेरीस पर्यंत ५०० अधिक गावांपर्यंत पोहचण्याचा उद्देश आहे. चंदा कोचर या  भारतातील प्रायव्हेट बँकेच्या हायेस्ट पेड CEO आहेत. 


फॉर्ब्स च्या प्रभावी महिलांच्या यादीत प्रियंकाचे नाव पहिल्यांदाच समाविष्ट झाले आहे. बॉलीवूड बरोबरच ती हॉलिवूडमध्ये देखील काम करत आहे. यादीत एचसीएल इंटरप्रायझेसच्या सीईओ रोशनी नाडर मल्होत्रा यांना देखील ५७ वे स्थान मिळाले आहे. बायोकॉन च्या एमडी आणि चेअरमन किरन मजुमदार शॉ या ७१ व्या स्थानावर आहेत. हिंदुस्तान टाइम्स ग्रुपच्या चेअरमन आणि एडिटोरिअल डायरेक्टर शोभना यांचा ९२ वा क्रमांक आहे.