मुंबई : लग्नानंतर लहान सहान कारणांवरून नवरा-बायकोत भांडण झालेली आपण पाहतो. खरतर छोटी मोठी भांडणं तर प्रत्येक ठिकाणी होतचं असतात. पण ती तिथल्या तिथे मिटलेलीच बरी असतात. पण जोडप्यांमधील भांडण ही वाढतच जातात. या प्रत्येकामागे काहीनाकाही कारणं असतात. लग्नाआधी काही गोष्टी स्पष्ट झाल्या तर आयुष्यभर त्याचा त्रास होत नसल्याच रिलेशनशीप एक्सपर्ट मानतात. तुम्हीपण नातं दृढ बनविण्याच्या किंवा लग्न करण्याच्या विचारात आहात तर या चार गोष्टी नक्की लक्षात ठेवा.


बाळाचं प्लानिंग 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतर बाळ होणं अशी अनेक परिवारांची इच्छा असते. आपण लवकरात लवकर आजी-आजोबा व्हावं असं नवरा-बायकोंच्या आईबाबांना वाटतं असतं. पण नवरा-बायकोंनी ही वैयक्तिक बाब आहे.


सुरुवातीच्या काळातच या विषयावरुन भांडण व्हायला लागली तर हे नात्याच्या भविष्यासाठी चांगल नसेल.


आपण स्वत:ला यासाठी संपूर्ण जबाबदार समजू तेव्हाच या गोष्टीत पडलेलं केव्हाही चांगल असेल. त्यामुळे थोडा वेळ घ्या आणि त्यानंतरच योग्य निर्णय घ्या.


सेक्सच सर्वकाही ?


पती-पत्नींतील नातं अधिक दृढ होण्यासाठी शारिरक संबंध आवश्यक असतात. पण यामुळे नात्यातील मधुरता कायमच राहिलं हे सांगता येत नाही.


दोघांमध्ये एकमेकांप्रती प्रेम, मान- सन्मान, एकमेकांची काळजी घेण्याची भावना नसेल तर नातं बनण्यास वेळ जाऊ शकतो.


शारिरिक संबंध म्हणजेच सर्वकाही असं होतं नाही. यासोबतच एकमेकांची भावना समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं.


काही लपवू नका 


नवरा आणि बायकोने एकमेकांपासून काही लपवून ठेवू नये. पण सध्या हे वातावरण बदलल्याचं दिसून येतंय.


करियर आणि परिवाराची जबाबदारी यामध्ये अशा अनेक गोष्टी होतात जे नवरा-बायको एकमेकांना सांगता येत नाहीत.


त्यामुळे प्रत्येक गोष्ट सांगायलाच हवी यासाठी दबाव आणू नका.


पारिवारीक मतभेद 


लग्नानंतर दोन वेगवेगळे परिवार एकत्र येतात. प्रत्येक परिवाराचे राहणीमान, संस्कार वेगवेगळे असतात. त्यामुळे खटके उडण्याचे प्रसंग येतात.


अशावेळी नवरा-बायकोने एकमेकांना विश्वासात घेऊन कोणताही निर्णय घ्यायला हवा.