मुंबई : गर्भधारणेनंतर महिलांची अधिक प्रमाणात काळजी घेणं गरजेचं असतं. गरोदरपणात कोणतीही ट्रीटमेंट करायची असेल त्यावेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. कारण केमिकल्सचा वापर बाळाच्या आरोग्यासाठी धोकादायक मानला जातो. पण गरोदर महिलांनी हेअर स्पा म्हणजेच केसांसंबंधी ट्रिटमेंट करणं सुरक्षित आहे का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, गरोदरपणात हेअर स्पा किंवा हेअर ट्रीटमेंट करताना काळजी घ्यावी. 


नैसर्गिक तेलांचा वापर


केमिकल हेयर स्पा किंवा केसांसदर्भात कोणताही ट्रीटमेंट करताना केसांना नैसर्गिक तेल लावा. ज्यामुळे केसांचं पोषण होईल आणि ताण देखील कमी होण्यास मदत होते.


अमोनिया फ्री प्रॉडक्स


गरोदर महिलांनी केसांसंदर्भात ट्रीटमेंट करताना नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा. हे प्रोडक्स हानिकारक ठरणार नाहीत. त्याचप्रमाणे अमोनिया फ्री प्रॉडक्सचा वापर करा. नैसर्गिक प्रॉडक्समुळे कोणताही त्रास होत नाही. 


पहिल्या तीन महिने ट्रीटमेंट घेणं टाळा


गर्भधारणेचे पहिले तीन महिने नाजूक मानले जातात. त्यामुळे या काळात अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे पहिल्या 3 महिन्यांमध्ये हेयर ट्रीटमेंट घेणार घेणं शक्यतो टाळलं पाहिजे.