मुंबई : आपण स्त्रीवादाचा, स्त्री स्वातंत्र्याच्या, समानतेच्या कितीही चर्चा केल्या तरी महिलांवर होणारे अत्याचाराचे वाढते प्रमाण आपण नाकारू शकत नाही. आपली पुढची पीढी वाईट मार्गावर जावू नये, म्हणून त्यांना काही शिकवणी देणे गरजेचे आहे. आपण मुलींवर जसे संस्कार करतो किंवा त्यांना जसं वळण लावतो तसेच महिलांचा सन्मान करण्यासाठी मुलांवरही संस्कार करणे, त्यांना योग्य ती शिकवण देणे गरजेचे आहे. त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी...


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    घरातली कामे फक्त मुलींनीच करावी, असा दंडक नसावा.

  • मुलांसमोर आपली पत्नी किंवा इतर महिलांची खिल्ली उडवू नका. त्यांचा अपमान करु नका.

  • महिला विमान चालवू शकतात तर गाडी का नाही? त्यामुळे त्यांच्या ड्रायव्हिंगचे किस्से करू नका. 

  • आपली पत्नी तसेच इतर महिलांचा सन्मान करा. महिलांचा सन्मान करण्याचे महत्त्व स्वतः जाणा आणि आपल्या मुलांनाही पटवून द्या.

  • बायकांना व्यवहारातले काही कळत नाही आणि त्यांना टेक्निकल गोष्टी समजत नाही, असे बोलून त्यांना हिणवू नका.

  • बायकांना हे काम जमणार नाही, हे त्या करू शकणार नाही, असेही चुकूनही बोलू नका. कारण यातून तुमच्या मुलांना स्त्री-पुरूष समानतेचा नकळत संदेश मिेळेल.