पिरीयड्सच्या दिवसांमध्ये धावपळ करणं ठरतं धोकादायक?
मासिक पाळीच्या काळात धावपळ केल्याने वेदना अधिक वाढते, असाही समज बऱ्याच जणींच्या मनात असतो.
मुंबई : पूर्वीच्या काळात मासिक पाळीच्या दिवशी महिला स्वतःला एका खोलीत बंद करून ठेवायच्या. मात्र आता महिला असं न करून ऑफिसलाही जातात. अशा काळात महिलांची होणारी धावपळ योग्य आहे का हा प्रश्न उपस्थित होतो. मासिक पाळीच्या काळात धावपळ केल्याने वेदना अधिक वाढते, असाही समज बऱ्याच जणींच्या मनात असतो. मात्र हा केवळ एक चुकीचा समज आहे.
मासिक पाळी दरम्यान रनिंग करणं किंवा धावपळ होणं सामान्य आहे. यासंबंधीचे एक संशोधनही समोर आलं आहे. ज्यानुसार मासिक पाळी दरम्यान शारीरिक हालचाली करता येऊ शकतात. यामुळे मासिक पाळीच्या वेदनेपासून आराम मिळतो.
मासिक पाळीत धावपळ झाल्यास ब्लड फ्लो वाढतो का?
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, धावल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह वाढतो. ज्यामुळे मासिक पाळीचा ब्लड फ्लो वाढू शकतो.
पिरीयड्समध्ये धावपळ करताना कोणती काळजी घ्याल?
मासिक पाळीदरम्यान वेदना अधिक होत असतील तर धावपळ न करणं फायदेशीर ठरेल
पिरीयड्सच्या दिवसात सतत धावू नका
तुमच्या शरीरात जर पाण्याची कमतरता असेल तर धावणं टाळा
पिरीयड्सच्या काळात धावताना कमी वेगाने धावा