मुंबई : गर्भधारणेचा काळ हा प्रत्येक महिलेसाठी वेगळा आणि फार खास असतो. या काळात महिला त्यांची अधिक काळजी घेतात. अशा दिवसांत महिलांच्या शरीरात अनेक मोठे बदल होतात. यामधील एक महत्त्वाचा बदल म्हणजे हार्मोनल चेंजेस. मात्र असं गरजेचं नाही की गर्भधारणेच्या काळात प्रत्येक महिलेला सारखीच लक्षणं किंवा संकेत दिसून येतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामान्यपणे पीरियड्स मिस होणं हा गर्भधारणेचा मुख्य संकेत असतो. मात्र या काळात महिलांच्या शरीरात असे अनेक बदल होतात जी गर्भधारणेची लक्षणं असतात. जाणून घेऊया ही लक्षणं नेमकी कोणती?


मॉर्निंग सिकनेस


गर्भधारणेच्या काळात महिलांना सकाळी उठल्यानंतर उल्टी होण्याची समस्या जाणवते. पीरियड्स मिस झाल्यानंतर प्रामुख्याने महिलांमध्ये ही तक्रार दिसून येते. असं नाही की प्रत्येक महिलेला हा त्रास सकाळी होईल, दिवसातील कोणत्याही वेळी महिलांनी हा उल्टीचा त्रास होऊ शकतो. गर्भधारणेनंतर काही आठवड्यांत दिसणारं हे एक लक्षणं आहे.


स्तनांमध्ये बदल


गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात महिलांना स्तनांमध्ये बदल जाणवतो. यावेळी महिलांना स्तन जड वाटणं किंवा सूजणं हे बदल दिसून येतात. सामान्यपणे महिलांच्या निप्पलचा कलर आणि ब्रेस्ट साईजमध्ये अंतर दिसत नाही. मात्र गर्भधारणेत हे बदल दिसतात.


थकवा


गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात महिलांना थकवा जाणवतो. यावेळी शारीरिक, मानसिक आणि हार्मोन्समध्ये बदल होतात. ज्यामुळे या बदलांचा सामना करावा लागतो. 


स्पॉटिंग  


गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात स्त्रियांना स्पॉटिंग होतं. याला इम्प्लांटेशन ब्लीडिंग असंही म्हटलं जातं. यावेल ब्लडचा रंग फिकट गुलाबी किंवा तपकिरी रंगाचे असू शकतो. तुमची मासिक पाळी सुरू होण्याच्या एक किंवा दोन आठवड्यांपूर्वी हे दिसू शकतं. मात्र असं झाल्यास महिलांनी घाबरून जाऊ नये. 


गंधाबाबत संवेदनशीलता


गर्भधारणेच्या काळात महिलांना एखाद्या गोष्टीचा गंध तीव्र प्रमाणात जाणवतो. असं होतं कारणं या काळात महिलांच्या शरीरात एस्ट्रोजन हार्मोनची पातळी वाढते.