पिरीयड्स मिस होणं म्हणजे प्रेग्नेंसी हेच कारण नाही तर....
पिरीयड्स मिस होणं हे केवळ गर्भधारणेचं लक्षण नाही. काही जीवनशैलीतील बदल आणि इतर गोष्टींमुळेही पिरीडयड्स मिस होऊ शकतात.
मुंबई : पिरीयड्स मिस झाल्याचं पहिलं कारण म्हणजे प्रेग्नेंसी मानलं जातं. अशावेळी महिला लगेच प्रेग्नेंसी टेस्ट करून घेतात. मात्र पिरीयड्स मिस होणं हे केवळ गर्भधारणेचं लक्षण नाही. काही जीवनशैलीतील बदल आणि इतर गोष्टींमुळेही पिरीडयड्स मिस होऊ शकतात. काही औषधं आणि शारीरिक समस्या तुमच्या मासिक पाळीवर परिणाम करू शकतात.
जाणून घेऊया पीरियड्स मिस होण्याची इतर कारणं
तणाव
अधिक ताण Gonadotropin हार्मोन रिलीज करण्याला रोखतो. हे तुमच्या ओव्यूलेशन आणि मासिक पाळीच्या चक्राला नियंत्रित करतो. शारीरिक आणि मानसिक या दोन्ही प्रकारच्या तणावाचा परिणाम मासिक पाळीवर होतो.
दैनंदिन शेड्यूलमध्ये बदल
दररोजचं शेड्यूल बदलल्याने तुमच्या शरीराच्या सिस्टीमला खराब करते. जर तुम्ही कामाची शिफ्ट दिवसातून रात्री करत असं शेड्यूल बदलत असाल तर त्याचा परिणाम मासिक पाळीच्या चक्रावर होऊ शकतो.
औषधांचा परिणाम
काही औषधं जसं की एंटीडिप्रेसंट, एंटी सायकोटिक्स, थायरॉईड त्याचप्रमाणे काही केमोथेरेपीच्या औषधांनी मासिक पाळी उशीरा येण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे गर्भनिरोधक गोळ्यांनी पीरियड्सवर परिणाम होऊ शकतो.
वजनात बदल
जास्त वजन असणं किंवा वजन कमी होणं या वजनातील बदलामुळे देखील मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम होतो. स्थूलपणा एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन हार्मोन्सवर परिणाम करतं.