नवी दिल्ली : डिजिटल मार्केटिंगचा सातत्याने होणार विस्तारामुळे रोजगाराच्या संधी देखील वाढत आहेत. अशा अनेक कंपन्या आहेत ज्या व्यवसाय वाढवण्यासाठी नवनव्या स्कीम्स राबवत आहेत. तुम्हाला घरबसल्या पैसे कमवायचे असतील तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. या संधीचा फायदा गृहिणी देखील घेऊ शकतात. नामांकीत ट्रॅव्हल पोर्टल मेक माय ट्रिप (Make My Trip) गृहिणींसाठी खास संधी घेऊन येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉलीडे एक्‍सपर्ट माध्यमातून ही कंपनी आपला विस्तार वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र यासाठी गृहिणींना प्राधान्य दिले जाणार आहे. त्या घरबसल्या काम करू शकतात.  ट्रि‍प प्‍लानिंगसाठी गाईडलाईन्स देण्याचे काम गृहिणींना देण्यात येणार आहे. पुढच्या तीन महिन्यात हॉलिडे एक्स्पर्ट वाढवणे, हा कंपनीचा उद्देश आहे. 


अर्ज करण्यासाठी पात्रता :


 


ज्यांच्याकडे  सध्या काही रोजगार नाही अशा महिला फुल टाईम आणि पार्ट टाईम कामासाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर कम्युनिकेशन स्किल चांगले असणे गरजेचे आहे. याचबरोबर घरात लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असणे गरजेचे आहे. तसंच त्या महिला उमेदवाराला फेसबुक आणि इंस्टाग्रामची माहिती असणे आवश्यक आहे. 


कामाचे स्वरूप :


हॉलिडे इंक्वायरी करणाऱ्या ग्राहकाला माहिती देण्याबरोबरच हॉलिडे एक्‍सपर्टला पॅकेज कॉस्टिंगचे काम करावे लागेल. त्याचबरोबर ग्राहकांकडून विचारलेल्या जाणाऱ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देणे गरजेचे आहे. मेट्रो शहरात आणि मिनी मेट्रो शहरात राहणाऱ्या महिलांना ही संधी मिळेल. सध्या मेक माय ट्रिप या कंपनीत हॉलीडे एक्सपर्ट म्हणून ७०० महिला काम करत आहेत. येत्या पुढील काळात ही संख्या १२०० ते १५०० करण्याचा कंपनीचा मानस आहे. निवड झालेल्या महिलांना कंपनीकडून विशेष ट्रेनिंग देण्यात येईल. यात साधारणपणे २५ ते ४५ वयोगटातील महिलांना संधी देण्यात येईल. 


अर्ज कसा करावा ?


तुम्हाला जर यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही http://careers.makemytrip.com/  या साईटवर जा. तिथे तुम्हाला जॉबची लिंक दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला कंपनीत उपलब्ध असलेल्या व्हेकन्सीसची माहिती मिळेल. त्यात संबंधित पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता.