मराठी माणसाचं आवडतं दादरचं प्रकाश उपहार गृह
मुंबईतील दादरचं प्रकाश उपहार गृह हे अनेक मराठी माणसांना माहित आहे, येथील साबुदाणा वड्याला असलेली चव ही महाराष्ट्रात कुठे मिळणे अशक्य आहे.
मुंबई : मुंबईतील दादरचं प्रकाश उपहार गृह हे अनेक मराठी माणसांना माहित आहे, येथील साबुदाणा वड्याला असलेली चव ही महाराष्ट्रात कुठे मिळणे अशक्य आहे, येथील भाजीपुरी, पियुष तर आणखी लोकप्रिय आहेत, येथील प्रत्येक पदार्थ हा चविष्ट आहे. दादरच्या प्रकाश उपहार गृहाने अनेक दिवसांपासून मराठी माणसाच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
येथील कोथिंबीरवडी, श्रीखंड पुरीची चव लयीच भारी म्हणावी लागेल, येथील ग्राहकांना दिली जाणारी सेवा देखील जलद आहे. ज्या प्रमाणे वस्तुंचा दर्जा आहे, त्यानुसार किंमत लावण्यात आलेली आहे. खाण्याचं खरं समाधान प्रकाश उपहार गृहात मिळंत, हे उपहार गृह नेमकं कसं आहे, हे वरील व्हिडीओत पाहा.