मुंबई : गोल्ड पेटीएमने तुम्हाला सोनं खरेदीची अनोखी संधी दिली आहे. ही गोल्ड पेटीएम योजना 10 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे, आणि 19 ऑक्टोबर रोजी बंद होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला 1 रूपयात देखील सोनं खरेदी करता येणार आहे. तुम्ही 10 हजारापेक्षा जास्त सोने खरेदी केल्यास, गोल्ड फेस्ट हा प्रोमोकोड मिळवून शकता, यानंतर तुम्ही 3 टक्के जास्त सोनं मिळवू शकता. तरीही पेटीएमवर सोने खरेदी करताना, त्यांच्या अटी व शर्ती व्यवस्थित वाचून खरेदी करणे आवश्यक आहे.


फक्त खरेदीच नाही तर गुंतवणुकीचीही पेटीएम गोल्ड संधी देत आहे. गोल्ड ईटीएफमुळे कमी गुंतवणूक देखील शक्य आहे, आणि यावर कमी शुल्क आकारलं जाणार आहे. 


तुम्ही या माध्यमातून भारत सरकारची गोल्ड बॉन्ड योजना आहे, त्यातही गुंतवणूक करू शकता.किमान 1 ग्रँम ते 4 किलो इतक्या सोन्याची गुंतवणूक एका व्यक्तीसाठी शक्य आहे. तर ट्रस्टना देखील यात गुंतवणुकीची संधी आहे.


दिवाळी निमित्ताने आकर्षक योजना पेटीएमने आणली आहे, नोटाबंदी काळात पेटीएम सर्वात जास्त नावारूपाला आलं. आता पेटीएमने थेट सोने खरेदीवरही ऑफर्स सुरू केल्या आहेत.