मुंबई : बाळ झाल्यानंतर महिलांना सतावणारी एक प्रमुख चिंता म्हणजे पोट सुटणं. ज्यावेळी महिलेला गर्भधारणा होते तेव्हा तिच्या शरीरात अनेक बदल होतात. यावेळी शरीरात बदल होणं ही एक नैसर्गिक प्रकार आहे. अशातच प्रसूतीनंतरही काही स्त्रियांना समस्या उद्भवतात. प्रसूतीनंतर पोट सुटणं सामान्य आहे, पण त्यावर नियंत्रण ठेवणंही तितकंच गरजेचं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक 10 पैकी 6 महिलांना डिलीव्हरीनंतर पोट सुटण्याचा त्रास जाणवतो. अनेक प्रयत्नांती देखील महिला सुटलेलं पोट कमी करू शकत नाहीत. 


विशेषत: भारतीय महिलांना ही तक्रार अधिक जाणवते कारण त्या बेजबाबदार असतात. दरम्यान आता कोणत्या निष्काळजीपणामुळे प्रसूतीनंतर महिला त्यांचं वजन कमी करू शकत नाहीत याची कारणं जाणून घेऊया.


  • प्रसूतीनंतर वजन कमी न होण्याचं मुख्य कारण म्हणजे महिलांच्या चुकीच्या आणि अवेळी खाण्याच्या सवयी. वेळेवर न खाणे आणि एकाचवेळी अतिप्रमाणात खाणे यामुळे लठ्ठपणा वाढतो. जर वजन कमी करायचं असेल तर वेळेवर खा. यासोबतच तुमच्या आहारात अधिक फळं आणि भाज्यांचा समावेश करा.

  • बाळ झाल्यानंतर बऱ्याच महिला अशक्त होतात. ज्यामुळे त्यांच्या शारिरीक हालचालीवरही परिणाम होतो. यामुळे वजन वाढीची समस्या उद्भवते.

  • प्रसूतीनंतर काही महिला स्ट्रेस आणि पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये जातात. वजन वाढीचं हे प्रमुख कारण मानलं जातं.

  • सी सेक्शनद्वारे डिलीव्हरी झाली असेल तर वजन वाढीची शक्यता वाढते.

  • बाळाच्या जन्मानंतर मासिक पाळी अनियमित झाली तरीही वजन वाढू लागतं.

  • हायपोथायरॉईड देखील गर्भधारणेदरम्यान वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो.


वजन वाढू नये याची काळजी कशी घ्याल?


बाळाला स्तनपान द्या


अनेक महिला प्रसूतीनंतर बाळाला स्तनपान देत नाहीत. यामुळे शरीराच्या ठेवणीवर परिणाम होतो असं महिलांचं मत असतं. मात्र स्तनपान दिल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. कारण स्तनपानामुळे 500 कॅलरीज खर्च होतात.


पूर्ण झोप घ्या


प्रसूतीनंतर ताण अजिबात घेऊ नका. यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे कमीत कमी 8 तासांची झोप घेतली पाहिजे. 


हल्का व्यायाम


महिलांना नियमितपणे हलका व्यायाम करा. जर तुम्हाला शारीरिकदृष्ट्या खूप अशक्त वाटत असेल, काहीवेळ पायी चाला. याशिवाय तुम्ही अनुलोम-विलोम अशी योगासनंही करू शकता.