लंडन : कोरोना व्हायरसबाबत अजूनही लोकांच्या मनात प्रश्न आहेत. कोरोनाचे काय काय परिणाम होतात याचीही तज्ज्ञ माहिती घेतायत. तर कोरोनाचा आईच्या दुधावर काही परिणाम होतो का असा प्रश्नही होता. तर या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लंडनमधील एका महिलेचा दावा आहे की, कोरोनाची लागण झाल्यानंतर तिच्या दुधाचा रंग पांढरा ऐवजी हिरवा झाला. महिलेने तिच्या दाव्याच्या एक फोटो देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये दुधाने भरलेले दोन पॅक दिसतायत. या एका पॅकमध्ये ठेवलेलं दूध पांढरे आणि दुसरं हिरवं असल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय.


'द सन'च्या रिपोर्टनुसार, ही महिला अश्मिरी आणि तिच्या मुलीला कोरोनाची लागण झाली होती. संसर्ग झाल्यानंतर, तिला असं आढळले की तिचं ब्रेस्ट मिल्क पांढरं नसून ते हिरवं झालं आहे. 


सुरुवातीला तिला धक्का बसला, पण नंतर तिला वाटलं दुधाचा रंग बदलत असल्याने तिचं शरीर तिच्या मुलीच्या पोषणासाठी अधिक पोषकतत्वं तयार करतंय. ती म्हणाली, "मला आईच्या दुधाचा फोटो शेअर करायचा होता, जेणेकरून मी लोकांना सांगू शकेन की ते खरोखरच काहीतरी वेगळं आहे'


आश्मिरीने असंही सांगितले की, "कोरोनाची लागण झाली होती त्यावेळी ब्रेस्ट मिल्क ती स्वतःही प्यायली होती. आईच्या दुधाचे फायदे आपल्या सर्वांना माहीत आहेत. त्यामुळे जेव्हा मी आजारी पडलो तेव्हा मला वाटले की हे दूध प्यायलं पाहिजे. मला सांगायला अजिबात संकोच वाटत नाही की मी माझं ब्रेस्ट मिल्क प्यायली आहे."


तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, आतापर्यंत आईच्या दुधात कोरोना व्हायरस पोहोचल्याची कोणतीही माहिती नाही. 


लैक्टेशन कन्सल्टंट गोल्डिलॅक्ट्सने अश्मिरीची पोस्ट शेअर केली आणि लिहिले, 'लिक्विड ग्रीन गोल्ड, ब्रेस्ट सुपर रिस्पॉन्सर्स आहेत'. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, स्तनपान करताना आई आणि बाळाचे शरीर पूर्णपणे स्कॅन करते आणि बाळाच्या आरोग्यासाठी आईच्या दुधात काय आवश्यक आहे हे शोधून काढते. आईच्या दुधाच्या रंगात बदल इम्युनोग्लोबुलिन, पांढऱ्या रक्त पेशी आणि ल्यूकोसाइट्समध्ये वाढ झाल्यामुळे रंगामध्ये बदल झाला असावा.