आईच्या दुधापासूनही तयार केले जातायत दागिने, पाहा कसे
तुम्ही कधी आईच्या दुधापासून बनवलेल्या दागिन्यांबद्दल ऐकलंय का? इतकंच नाही तर आजकाल लोकं आईच्या दूधापासून बनवलेल्या दागिन्याचा बिझनेसही करतात.
मुंबई : सोन्याचे, चांदीचे किंवा प्लॅटिनमचे दागिने तुम्ही यापूर्वी पाहिले असतील. या धातूच्या दागिन्यांचा वापरंही तुम्ही केला असेल. मात्र तुम्ही कधी आईच्या दुधापासून बनवलेल्या दागिन्यांबद्दल ऐकलंय का? इतकंच नाही तर आजकाल लोकं आईच्या दूधापासून बनवलेल्या दागिन्याचा बिझनेसही करतात.
आईच्या दुधापासून बनणारे दागिने
तीन मुलांची आई असलेल्या साफिया रियादने स्वतःच्या दुधाचा वापर करून दागिने बनवले आहेत. साफिया रियाद आणि तिचा पती अॅडम रियाद मॅजेन्टा फ्लॉवर्स कंपनीमद्ये आईच्या दुधापासून मौल्यवान खडे बनवण्याचं काम करतात. या कंपनीने 2019 पासून बिझनेसमध्ये प्रवेश केला. त्यानुसार आतापर्यंत 4,000 ऑर्डर दिल्या आहेत.
बिझनेसचा विस्तार केला
या बिझनेसचा विस्तार करत यामध्ये आईच्या दुधापासून बनवलेल्या दागिन्यांचीही त्यात भर घातली आहे. आईच्या दुधापासून बनवलेल्या दागिन्यांची मागणीही वाढताना दिसतेय. अशा प्रकारचे दागिने एका महिलेला तिचं मातृत्व टिकवून ठेवण्यास मदत करतात. आई आणि मूल यांच्यातील बंध जपण्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो, असं त्याचं मत आहे.
15 कोटींची बिझनेस
कंपनीने 2023 पर्यंत 1.5 दशलक्ष पाऊंड म्हणजेच 15 कोटींचा व्यवसाय केला आहे. 'द मिरर'च्या माहितीनुसार, या जोडप्याने कुठेतरी आईच्या दुधापासून बनवलेल्या ज्वेलरीबाबत वाचलं होतं. त्यानंतर दोघांनी त्याचा बिझनेस करण्याचा निर्णय घेतला. या दागिन्यांमध्ये हार, कानातले आणि अंगठ्या यांचा समावेश आहे.
30 मिलीलीटर दूधाची गरज
एका दागिन्यासाठी, किमान 30 मिली दूध देण्याची आवश्यकता आहे. या संशोधनामुळे दुधाचा रंग कायम राहील याची काळजी घेण्यात येते. कंपनीने दागिने दीर्घकाळ स्वच्छ ठेवण्यासाठी एक फॉर्म्यूला शोधण्यासाठी फार मेहनत घेतलीये.