मुंबई : स्त्री ही देवाला ही न उलघडणारे कोडे आहे असं म्हणतात. कारण.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्त्रियांना नेमक्या कधी कोणत्या गोष्टी आवडतील याचा काहीच अंदाज लावता येत नाही. अशावेळी पुरूषांना कायम प्रश्न पडतो की आम्ही नेमकं काय करायचं जेणे करून स्त्रियांचं लक्ष आपल्याकडे वळवता येतील. 
या प्रश्नाचं उत्तर सोडवण्याचा आम्ही थोडा प्रयत्न केला आहे. पुरूषांमधील काही ठराविक गोष्टी महिलांना आकर्षित करतात. पुरूष किती देखणा आहे यापेक्षा तो किती टापटिप आहे याकडे अधिक लक्ष देणाऱ्या महिला भरपूर आहेत. अशा वेळी महिलांना खूष करण्यासाठी नेमकं काय कराल?


पिंक कलर ट्राय करा


वाचताना थोडं ऑड वाटेल पण हे नक्की करा. मुलींचा पिंक कलरसोबत सॉफ्ट कॉर्नर असतो आणि अशा वेळी एखाद्या मुलाने पिंक कलर घातला तर त्याकडे मुली इंप्रेस होण्याचे चान्सेस जास्त असतात. तुम्ही हॉट पिंक घालावे हे आवश्यक नाही. तुम्ही लाइट पिंक ट्राय करु शकता.  आणि तोच मुलांना अधिक छान दिसतो. फ्रांसचया University of Poitiers च्या संशोधनानुसार मुले पिंक घाततात ते रोजच्या तुलनेत जास्त आनंदी राहतात. स्टँड कॉलरचे शर्ट यामध्ये अधिक खुलून दिसतात. 


वेल फिटेड जॅकेट घालावे


चांगल्या फिटिंगच्या ब्लेजरमध्ये हात आणि शोल्डर्स मोठे दिसतात आणि कंबर हेवी दिसत नाही. यामुळे जॅकेट/ब्लेजर मुलींना खुप इंप्रेस करतात. यामध्ये ब्लॅक, ब्राऊन रंगाचे जॅकेट अधिक चांगले दिसतात. लेदर जॅकेटदेखील मुलींना अधिक आवडतात. 

चांगल्या फिटिंगची Jeans घालावी


तुम्ही कोणत्याही वयातील असले तरीही तुम्ही एक चांगल्या फिटिंगची जीन्स घालावी. जीन्सचा परफेक्ट कट तुम्हाला फिट दिसण्यात मदत करेल. तसेच जिन्स फिटिंगमुळे तुम्ही आणखी स्मार्ट दिसतात. यामध्ये लाईट ब्लू रंग देखील छान दिसेल. 


माइल्ड परफ्यूम 


परफ्यूमच्या जाहिराती मुली आवर्जून पाहतात. कारण त्यांना माइल्ड परफ्यूम आवडतं. चांगल्या आणि लाइट fragrance मुलींना खुप influence करतात. परंतु परफ्यूम थोडा माइल्ड असावा, स्ट्राँग असू नये. या परफ्यूमद्वारे तुम्ही महिलांना आकर्षित कराल. 


V-neck टी-शर्ट


अनेक वेळा व्हाइट राउंड नेक टी-शर्टला बनियान समजले जाते. तर V-neck टी-शर्टसोबत असे होत नाही, हे तुम्हाला स्टायलिश लुक देते. V-neck मध्ये तुम्ही ब्राइट कलर्स ट्राय करु शकता. परंतु लक्षात ठेवा की, टी-शर्ट जास्त डीप नसावा. हिवाळ्यामध्ये तुम्ही V-neck स्वेटर्स घालून इम्प्रेस करु शकता.


वॉच 


तुमच्यासाठी वॉच घालणे जास्त महत्त्वाचे नसेल. परंतु मुली या लहान-लहान डिटेल्स पाहून खुप इंप्रेस होतात. वॉच एक अशी वस्तू आहे, जी बोलताना तुमच्यावर चांगले इम्प्रेशन पाडू शकते. तुम्ही एक क्लासी किंवा स्पोर्टी वॉच अवश्य घ्या. तसेच ब्रँडेड वॉच खूप छान दिसतात. ब्राऊन रंगाचे वॉच हातात उठून दिसतो. 


Stylish शूज


शूज एक असा ऑप्शन आहे, जो तुमचे फर्स्ट इम्प्रेशन खुप चांगले पाडते. तुम्ही एक स्टायलिश लेदर शूज घ्या, हे तुम्हाला क्लासी आणि रिच लुक देईल.यामध्ये तुम्ही ब्रँडेड शूज वापरल्यास अधिक चांगल इम्प्रेशन पाडू शकता. शूज हे कायम ट्रेंडी असावेत. आणि शूज वापरताना लक्षात ठेवा की फक्त ब्लॅक, ब्राऊन न वापरता त्यामध्ये वेगवेगळे रंग ट्राय करा. त्याचप्रमाणे मध्ये एक ट्रेंड आला होता की दोन वेगवेगळ्या रंगाचे शूज घालायचे हे सुद्धा छान दिसतं त्यामुळे नक्की ट्राय करा. 


 कश्मीरी वूल स्वेटर


नियमित स्वेटर्सच्या जागी कश्मीरी वूलनचे स्वेटर ट्राय करा. हे खुप सॉफ्ट असण्यासोबतच लाइट वेट आणि आरामदायक असतात. हे तुमच्या स्टाइलमध्ये सॉफ्टनेस अॅड करेल आणि मुलींना खुप पसंत येईल. आणि वूल स्वेटर कायमच तुमची वेगळी पर्सनॅलिटी समोर आणतात. आता हिवाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे हा पर्याय उत्तम आहे.