Unwanted pregnancy चं नो टेन्शन; गर्भधारणा रोखण्याचा एक अनोखा मार्ग
गर्भधारणा टाळू इच्छिणाऱ्या महिलांसाठी बाजारात गर्भनिरोधक गोळ्यांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
मुंबई : गर्भधारणा टाळू इच्छिणाऱ्या महिलांसाठी बाजारात गर्भनिरोधक गोळ्यांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बाजारात उपलब्ध असलेल्या गर्भनिरोधक गोळ्या लैंगिक संबंधाच्या 24 ते 48 किंवा 72 तासांच्या आत महिला सेवन करू शकतात. आत्तापर्यंत वापरल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या पाण्यासोबत घेतल्या जातात, पण तुम्हाला माहित आहे का, की तुम्ही गर्भनिरोधक गोळ्या पाण्याशिवाय चावून देखील घेऊ शकता.
चघळलेल्या गर्भनिरोधक गोळ्या देखील इतर गर्भनिरोधकाप्रमाणेच काम करतात. या गोळ्यांचं सेवन करताना आपल्याला त्या पाण्याबरोबर घेण्याची आवश्यकता नाही, आपण त्या चावून देखीस खाऊ शकता.
चावून खाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन असे दोन हार्मोन्स असतात. हे दोन्ही हार्मोन ओव्हुलेशन रोखण्यासाठी आणि गर्भधारणेचा धोका कमी करण्यासाठी कार्य करतात.
काय आहेत या गर्भनिरोधक गोळ्या
चघळण्यायोग्य गर्भनिरोधक गोळ्यांसाठी तुम्हाला पाण्याची गरज नाही. यामुळे ती इतर गर्भनिरोधक गोळ्यांपेक्षा खूपच वेगळी आहे. या गोळ्या अशा प्रकारे तयार केल्या आहेत की त्या चघळून किंवा चावून खाल्ल्या जाऊ शकतात. या गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन असल्यामुळे ते एग्सला ओवरीमध्ये इंप्लाट होण्यापासून रोखतात.
या गर्भनिरोधक गोळ्यांचे फायदे
चघळण्यायोग्य गर्भनिरोधक गोळ्यांचा एक फायदा म्हणजे त्या खाण्यास सोप्या असतात. ज्या महिलांना औषध गिळण्यास त्रास होतो त्यांच्यासाठी ही गोळी खूप फायदेशीर ठरू शकते. चघळण्यायोग्य गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये इतर गर्भनिरोधक गोळ्यांसारख्याच गोष्टी असतात, त्यामुळे दोन्ही प्रकारच्या गोळ्यांचे समान फायदे आहेत.