मुंबई : काही लोकांमध्ये वयानुसार चिडचिडेपणा कमी व्हायला पाहिजे, पण तो आणखी वाढत जातो. मात्र यासाठी सतत कामात असणे गरजेचे आहे. तसेच काही काही व्यायाम देखील आहेत.


व्यायामाचा चांगला परिणाम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 जर तुम्ही आठवड्यातून किमान ३ वेळा व्यायाम केला तरी तुमच्या चिडचिडेपणामध्ये फरक जाणवेल. चिडचिड होत असल्यास दररोज थोडा व्यायाम करा. यामध्ये १० मिनिटं पायी चालणं तसंच ४५ मिनिट वर्कआऊट तुम्ही करू शकता.


बागकाम करा


बागकाम केल्याने हात खराब होतील या विचाराने अनेकजण हे काम टाळतात. मात्र बागकाम केल्याने मेंदूकडून येणाऱ्या एका विशिष्ट केमिकलमध्ये वाढ होते. यामुळे चिडचिडेपणा कमी होण्यास मदत होते. तसंच हे काम केल्याने व्यायाम देखील होतो.


मेडिटेशन केव्हाही उत्तम


मेडिटेशन केल्याने तुमचं लक्ष तुमच्या श्वासावर केंद्रित राहतं. मेडिटेशन करणं केव्हाही उत्तम. परिणामी चिडचिडेपणा हा कमी होतो. यामुळे डोक्यातील विचार आपोआप निघून जातात. 


योग देखील महत्वाचा


योग हा मेडिटेशनचाच एक भाग आहे. योगामध्ये असणाऱ्या काही पद्धती किंवा आसनं यामुळे शरीरातील स्नायू आणि टिश्यू ताणले जातात. यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रणात राहून चिडचिडेपणा कमी होण्यास मदत होते. मात्र, योग करतवेळी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.


मसाज करणे चांगला उपाय


मसाज करणं हात, पाय, पाठ यामधील स्नायू आणि टिश्यूंसाठी उत्तम असतं. यामुळे स्नायू ताणले जातात. परिणामी ताण आणि चिडचिडेपणा येत नाही.


शांत झोप घ्या         


झोपण्यापूर्वी टीव्ही किंवा कॉम्प्युटरवर काम करू नये. तसंच नियमित व्यायाम केल्याने देखील शांत झोप लागण्यास मदत होते. जर तुम्हाला दररोज पुरेशी झोप मिळत नसेल तर चिडचिडेपणा वाढण्याची शक्यता असते. 


व्य़क्तीला ७ ते ९ तास झोप मिळलं गरजेचं असते. पुरेशी आणि शांत झोप मिळण्यासाठी खोलीत थंडावा, थोडा अंधार आणि शांतता असणं आवश्यक आहे.