COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : 'इनो' जे अॅसिटीडी काही सेकंदात कमी करण्यासाठी वापरले जाते, तेच 'इनो' लावून तुमचे हात आणि चेहरा गोरा होवू शकतो असा, एक व्हिडीओ यूट्यूबवर भारतात सर्वात जास्त पाहिला जात आहे. 


या व्हिडीओत एक महिला एका वाटीत लिंबूचा रस घेऊन त्यात इनो टाकते, ते हातावर घेते, यानंतर हातातला फेस हाताला आणि चेहऱ्याला लावते, यानंतर तुमचा चेहरा गोरा आणि हात गोरे होतात, असा दावा करते.


या दाव्यात किती तथ्य आहे, याविषयी अजून कुणीही दुजोरा दिला नसला तरी, गोरे दिसण्यासाठी अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला, यानंतर या व्हिडीओ यूट्यूबला ट्रेन्ड झाला आहे.


यूट्यूबने अशा प्रकारचे व्हिडीओ जे खूप जास्त पाहिले जातात, तसेच जे जाहिरातदारांच्या आणि यूट्यूबच्या मानांकनात बसत नाहीत, अशा व्हिडीओंसाठी जाहिराती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, लवकरच अशा प्रकारच्या व्हिडीओंना फटका बसणार आहे.


वरील व्हिडीओत किती तथ्य आहे हे माहित नाही, मात्र झी मीडिया या विषयी कोणताही दावा करत नाही. हा व्हिडीओ फक्त ट्रेन्ड होत आहे. वरील कोणताही प्रयोग करताना तज्ञांचा सल्ला घ्यावा.