Viral News : सोशल मीडियावर एका व्यक्तीने त्याने केलेल्या ऑपरेशनबद्दल अनुभव सांगितला आहे. त्याबद्दल जाणून तुम्ही पण अवाक् व्हाल. आज कॉस्मेटिक सर्जरी, Botox सर्जरी करुन अभिनेत्रीपासून अनेक महिला असो पुरुष आपले वय लपविण्याचा प्रयत्न करतात. शरीराच्या अवयवांची वेगवेगळी सर्जरी करणे यात काही नवीन राहिलं नाही. अगदी सौंदर्य खुलविण्यसाठी रंग उजवळण्यासाठीही अनेक सर्जरी करण्यात येतात. या सर्जरी अतिशय महागड्या असतात. त्यामुळे सर्वसामान्य लोक घरगुती उपायाने आपलं सौंदर्य जपत असतात. सोशल मीडियावर ज्या तरुणाने आपल्या सर्जरीबद्दल सांगितलं आहे. त्याने 2 इंचच्यासाठी 1 कोटी 45 लाख खर्च केला आणि आता पश्चाताप करतोय. (1 Crore 45 lakhs for 2 inches This person performed the most painful surgery in the world)



कोणाचं काय तर कोणाचं काय!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज ऑपरेशनने शरीराच्या अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात, एवढी विज्ञानाने प्रगती केली आहे. जर तुमची उंची कमी असेल तर तुम्ही काय कराल. तुम्ही समोरच्याला स्विमिंग करायला, दोरीवरच्या उड्या मारायला सांगाल ना. पण या पठ्ठाने उंची वाढविण्यासाठी ऑपरेशन करुन घेण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा शॉर्टकट आता त्याला भारी पडत आहे. 



अनेक रात्र तो रडत होता...


एफरसन कोशने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे की, शस्त्रक्रियेनंतर त्यांची उंची वाढल्याचा त्यांना आनंद झाला खरा... पण या ऑपरेशननंतर त्याला एवढ्या वेदना होत होत्या की तो अनेक रात्र झोपला नाही. वेदनेने तो रात्रभर रडत असायचा. कोशने या सर्जरीचा खर्चही सांगितला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Yef (@yefersoncossio)


जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. या शस्त्रक्रियेसाठी सुमारे 1 कोटी 45 ​​लाख रुपये खर्च झाले आहेत. शस्त्रक्रियेनंतर चार महिन्यांनंतर, तो आता आरामात चालू शकतो. एवढंच नाही तर फुटबॉलही खेळू शकतो.