Four Day Working Week In UK, ब्रिटन : ब्रिटन अर्थात UK मधील 100 कंपन्यांनी एकत्रितपणे एक मोठा निर्णय घेतला आहे. येथील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांचा आठवडा फक्त चार दिवसांचा(Four Day Working Week) असणार आहे. येथील कर्मचाऱ्यांना आठवड्यातील 4 दिवस काम करावे लागणार आहे. उर्वरीत 3 दिवस सुट्टी असणार आहे. या चार दिवसांमध्ये वर्किंग अव्हर हा देखील सात तासच राहणार असल्याची चर्चा आहे. अमेरिकेसारख्या देशांमध्ये मंदीचे सावट असताना ब्रिटनने घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत केले जात आहे.


पगारात कपात नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगभरातील अनेक बड्या कंपन्यांमध्ये  पाच दिवसांचा आठवडा आहे. म्हणजे पाच दिवस काम आणि दोन दिवस सुट्टी असते. यूकेमधील 100 कंपन्यांनी 'फोर डे वर्किंग वीक' लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व 100 कंपन्यांनी या निर्णयाला सहमती दर्शवली आहे. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणत्याही प्रकारची कपात केली जाणार नाही. चार दिवस काम करूनही त्यांना पाच दिवसांइतकाच पगार दिला जाणार आहे.


आठवड्यात फक्त 28 तास काम करावे लागणार 


फोर डे वर्किंग वीकचा निर्णय घेणाऱ्या या 100 कंपन्यांमध्ये 2600 कर्मचारी काम करतात. फोर डे वर्किंग वीकमुळे देशात परिवर्तन घडेल अशी यामागची धारणा आहे. फोर डे वर्किंग वीकचा निर्णय घेणाऱ्या या 100 कंपन्यांमध्ये ब्रिटनच्या दोन मोठ्या कंपन्यांचाही समावेश आहे. अॅटम बँक आणि ग्लोबल मार्केटिंग कंपनी एविन अशी या कंपन्यांची नावे असून तब्बल  450-450 कर्मचारी या दोन कंपन्यांमद्ये काम करतात.
फोर डे वर्किंग वीक अंतर्गत कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी केले आहेत. ब्रिटनमध्ये कामकाजाचा आठवडा 35 तासांचा आहे. या कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी अंदाजे 7 तास काम करतात. त्यानुसार कंपन्यांनी 35 तासांचे चार दिवसांमध्ये नियोजन केले आहे. कर्मचार्‍यांना दिवसाचे 7 तास काम करावे लागते. म्हणजेच आता कर्मचाऱ्यांना चार दिवसांत म्हणजेच आठवड्यात फक्त 28 तास काम करावे लागणार आहे.


फोर डे वर्किंग वीकचा कंपन्यांना काय फायदा होणार?


या निर्णयामुळे अनेक कर्मचारी या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी इच्छुक राहतील. यामुले कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध होईल. कर्मचाऱ्यांवर असणारा कामाचा ताण कमी होईल परिणामी कर्मचाऱ्याचा कामातील उत्साह वाढून कंपन्यांची उत्पादकता वाढेल. फोर डे वर्किंग वीकमुळे कर्मचारी नोकरी सोडून जाणार नाहीत. कर्मचाऱ्यांचे सुट्ट्या घेण्याचे प्रमाण कमी होईल. ब्रिटमधील 100 कंपन्यांनी घेतलेला हा फोर डे वर्किंग वीकचा निर्णय जगातील लेबर कायद्याअंतर्गत आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि ऐतिसिक निर्णय मानला जात आहे. 


जगावर मंदीचे सावट


जगावर पुन्हा एकदा आर्थिक मंदीचे सावट पहायला मिळत आहे. अनेक बड्या आयटी तसेच मार्केटींग कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नोकर कपात सुकु केली आहे. यामुळे हजारो लोक बेरोजगार झाले आहेत.