Saudi Arab Beheading Case : सौदी अरेबियाने गेल्या 10 दिवसांत 12 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा दिल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे कतारमध्ये फिफा वर्ल्ड कप (FIFA World Cup Qatar  2022) सुरु असताना काहीशे अंतरावर असलेल्या सौदीमध्ये इतक्या क्रूरपणे शिक्षा देण्यात आली आहे. लोकांचे लक्ष वळवण्यासाठी विश्वचषकाचा वापर करुन सौदीने हे कृत्य केल्याचे आरोप आता होत आहेत. याआधी सौदी अरेबियाच्या सरकारने हिंसा नसलेल्या गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा दिली जाणार नाही असे आश्वासन दिले आहे. मात्र आता पुन्हा एकदा इतक्या क्रूरपणे शिक्षा दिल्याने जगभरात चर्चा सुरु झालीय.


कोणत्या गुन्ह्यात शिक्षा दिली?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वृत्तानुसार, गेल्या 10 दिवसांत सौदी अरेबियात 12 जणांचा शिरच्छेद करण्यात आला आहे. हे आरोपी लोक ड्रग्जशी संबंधित गुन्ह्यांमध्ये (Drugs Case) दोषी होती अशी माहिती देण्यात आली होती. आरोपींचे शिर तलवारीने कापण्यात आल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षी सौदी अरेबियाने अशा गुन्ह्यांमध्ये इतक्या क्रूर शिक्षा देणार नसल्याचे म्हटले होते. यानंतरही डझनभर लोकांना फाशीची शिक्षा देऊन सौदी अरेबियाने पुन्हा एकदा आपल्या क्रूरतेचे उदाहरण मांडले आहे.


टेलीग्राफच्यानुसार, सौदी अरेबियामध्ये ज्या 12 जणांचा शिरच्छेद करण्यात आला, त्यापैकी बहुतेक जण परदेशातील आहेत. यामध्ये तीन पाकिस्तानचे, चार सीरियाचे आणि दोन जॉर्डनचे नागरिक आहेत. इतर तीन आरोपी हे सौदीचे नागरिक आहेत. सर्वांवर अंमली पदार्थांशी संबंधित कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप होता, त्यामुळे त्यांना मृत्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. याआधीही मार्च महिन्यात सौदी अरेबियाने एकत्रितरित्या 81 जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती. हे लोक हत्येच्या आणि दहशतवादी गटाशी संबंधित असलेल्या प्रकरणांमध्ये दोषी आढळले होते. 


सौदीत इतक्या क्रूर शिक्षा का दिल्या जातात?


सौदी अरेबियामध्ये हत्या, बलात्कार, मुलांचे अपहरण, शस्त्रास्त्रांची तस्करी, दहशतवादी कारवाया आणि ड्रग्ज या गुन्ह्यांसाठी अशा प्रकारच्या कठोर शिक्षा दिल्या जातात. यामुळेच या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्यांना सौदी अरेबियात एकत्ररित्या मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते.