घरात घुसून १२ वर्षीय मुलीची हत्या, दोन बहिणींवर बलात्कार
मेक्सिकोमधील सियूदाद जुआरेज शहरात हत्या आणि बलात्कार झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मेक्सिको : मेक्सिकोमधील सियूदाद जुआरेज शहरात हत्या आणि बलात्कार झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हत्येनंतर बलात्कार
एका व्यक्तीने १२ वर्षीय चिमुकलीची हत्या केली आणि त्यानंतर तिच्याच दोन लहान बहिणींसोबत बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
शहरात खळबळ
या घटनेमुळे संपूर्ण मेक्सिको शहरात खळबळ उडाली आहे. १२ वर्षीय मुलीचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाला आहे.
आरोपीचा शोध सुरु
सियूदाद जुआरेजमधील स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित मुलींचे वय ११ आणि १० वर्ष आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आरोपी फरार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
मुली घरात एकट्या असल्याची आरोपीला पूर्वीपासून होती माहिती
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या परिसरात आरोपीने हे कृत्य केलं आहे त्या परिसरात अत्यल्प उत्पन्न असलेले नागरिक राहतात. बुधवारी एका रहिवाशी कॉलोनीतील घरात आरोपीने हे कृत्य केलं. लहान मुली घरात एकट्या असल्याची माहिती पूर्वीपासूनच या आरोपीला असावी असं बोललं जात आहे.