Boy Survives After Falling From 100 Feet: कधी कधी एका चमत्कारामुळं तुमचा जीवही वाचला जाऊ शकतो. असंच एका 13 वर्षांच्या मुलासोबत घडलं आहे. एका भीषण दुर्घटनेनंतरही तो सुखरुप बचावला आहे. अमेरिकेतील एरिजोना राज्यात (Arizone State) मध्ये एका मुलासोबत ही आश्चर्यजनक घटना घडली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार एरिजोना राज्यात असलेल्या ग्रँड कॅन्यन (Grand Canyon) वरुन जवळपास 100 फूट खाली कोसळल्यानंतरही 13 वर्षांचा मुलगा बचावला आहे. काय घडलं नेमकं जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

8 ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे, एरिजोना येथील लोकप्रिय पर्यटक स्थळ असलेल्या नॉर्थ रिमच्या काठावरुन 13 वर्षांचा मुलगा खाली कोसळला आहे. वायट कॉफमॅन (Wyatt Kauffman) असं या मुलाचे नाव आहे. आश्चर्य म्हणजे दोन तासांच्या बचावकार्यानंतर ग्रँड कॅन्यन नॅशनल पार्कमधील बचाव दलाने त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले आहे. 


हात सुटला आणि 100 फूट खाली कोसळला


वायट कॉफमॅन यांनी स्वतः तो कसा खाली कोसळला याबाबत सांगितलं आहे. कॉफमॅनने सांगितलं की, ग्रँड कॅन्यनवर बसला असताना त्यांने एका हाताने दगडाला पकडून ठेवलं होतं. मात्र अचानक त्याचा हात सुटला आणि तो खाली कोसळला. खाली कोसळल्यानंतर तो गंभीर जखमी झाला होता. काही वेळाने त्याची शुद्ध हरपली जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो रुग्णालयात होता. रुग्णलयात कॉफमॅनवर उपचार करण्यात आल्यानंतर त्याला आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


खाली कोसळताच शुद्ध हरपली


वायट कॉफमॅनने घटनेनंतर म्हटलं आहे की, मी खाली कोसळल्यानंतर काहीवेळच शुद्धीत होतो. तेवढ्या वेळात मला एक अॅम्बुलन्स आणि त्याच्यापाठोपाठ एका हेलीकॉप्टरचा आवाज येत होता. त्यानंतर मला एका विमानात बसवण्यात आले तिथपर्यंतच मला लक्षात आहे. त्याच्या पुढचं मला काहीच लक्षात नाहीये. मला थेट रुग्णालयातच जाग आली. 


अनेक ठिकाणी झाले फ्रॅक्चर


ग्रँड कॅन्यनमधून 100 फूट खाली कोसळल्यानंतर कॉफमॅनच्या शरीरात अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहेत. मात्र काळजी करण्याचे काही कारण नाही. तो आता पूर्णपणे स्वस्थ आहे, असं रुग्णालयाचा हवाला देत बीबीसीने म्हटलं आहे. मात्र या घटनेमुळं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. देवाच्या कृपेमुळं मुलगा सुखरुप बचावला असल्याची प्रतिक्रियाही काही जणांनी दिली आहे.