Bus Accident : कुणाच्या आयुष्यात कोणता क्षण कधी येईल हे सांगता येवू शकत नाही. बऱ्याचदा असे प्रसंग येतात ज्यामुळे जीव धोक्यात येवू शकतो. धावत्या बसमध्येच ड्रायव्हर अचानक बेशुद्ध झाला. यामुळे बस अनियंत्रीत झाली. मात्र, याच बसमधून प्रवास करणाऱ्या एका लहान मुलाने तप्तरता दाखवली यामुळे 66 जणांचा जीव वाचला आहे. या मुलाच्या हुशारीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अमेरिकेत ही घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेच्या मिशिगन कार्टर मिडल स्कूलची ही स्कूल बस आहे. ही स्कूल बस घेवून जाणाऱ्या बसचा ड्रायव्हर बस चालवत असताना अचानक बेशुद्ध झाला. मात्र, याच बसमधून प्रवास करणाऱ्या लहान मुलगा देवदूत ठरला आहे. त्याच्यामुळे बसमधील 66 जणांचा जीव वाचवला आहे. हा सर्व घटनाक्रम CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 


या मुलाचे नाव डीलन रीव्स  (वय 13 वर्षे) असे आहे. डीलन हा मिशिगन कार्टर मिडल स्कूलमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकतो. नेहमी प्रमाणे डीलन हा स्कूल बसने प्रवास करत होता. या बसमध्ये एकून 66 विद्यार्थी होते. बस चालवत असताना बसचा ड्रायव्हर अचानक बेशुद्ध झाला. यामुळे बस अनियंत्रीत झाली. बसमधून प्रवास करणारे विद्यार्थी भयभीत झाले. मुलांनी आरडा ओरडा सुरु केला. बसमध्ये एकच गोंधळ उडाला आहे.


हुशारीमुळे वाचला 66 जणांचा जीव


ड्रायव्हर बेशुद्ध झाल्यामुळे बस अनियंत्रीत होवून मोठा अपघात होईल अशी भिती होती. इतक्यात डीलन धावत आला आणि त्याने बस थांबवली. यामुळे मोठा अपघात टळला आणि बसमधील 66 जणांचा जीव वाचला आहे. 


डीलन याने नेमके काय केले?


ड्रायव्हर बेशुद्ध झाल्याचे पाहून डीलन इतर विद्यार्थ्यांप्रमाणे न घाबरता धावत ड्रायव्हरजवळ आला. त्याने स्टेअरिंग व्हील दाबून बस कंट्रोल केली आणि बस थांबवली. यानंतर त्याने एतर मुलांना शात केले. त्याने आपातकालीन क्रमांक 911 वर संपर्क साधून मदत मागितली. 


या सर्व प्रकार बसमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये बसचा ड्रायव्हर बस चालवताना अचानक बेशुद्ध झाल्याचे दिसत आहे. यानंतर हा मुलगा येवून बस कंट्रोल करताना दिसत आहे. मुलाच्या या हुशारीचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाळेतर्फे मुलाचा विशेष सत्कार देखील करण्यात आला.