Cake Dress Guinness World Record : सध्या फॅशनच्या नावावर अनेक चित्रविचित्र ट्रेंड पहायला मिळत आहेत. मात्र, आता एक असा ड्रेस तयार करण्यात आला आहे जो ड्रेस घालू पण शकतो आणि खावू पण शकतो, चक्क केकपासून हा ड्रेस (Cake Dress) तयार करम्यात आला आहे. एका मॉडेलने हा ड्रेस घातला आहे.  131 किलो वजन असलेल्या या अनोख्या केक ड्रेसची Guinness World Record मध्ये नोंद झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

15 जानेवारी 2023 रोजी बर्न, स्वित्झर्लंड येथील स्विस वर्ल्ड वेडिंग फेअरमध्ये एका मॉडेलने हा केक ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.  स्वित्झर्लंडमधील केक बनवणाऱ्या नताशा कॉलिन किम फाह ली फोकस यांनी सर्वात मोठा केक तयार केला आहे. हा केक म्हणजे एक प्रकारचा वेडिंग ड्रेसच आहे. 


नताशा यांचा स्विटकेक्स नावाचे केक स्टोर आहे. सर्वात मोठा केक तयार नवा विक्रम रचण्याचा त्यांचा संकल्प होता. मात्र, या केकचे डिजाईन देकील हटके अससे पाहिजे असे त्यांना वाटत होते. यातूनच त्यांना या अनोख्या केक ड्रेसची संकल्पना सुचली. 
नताशा यांनी तब्बल 131 किलो वजनाचा केक ड्रेस बनवत नवा विश्व विक्रम रचला आहे. त्यांच्या या अनोख्या विक्रमाची Guinness World Record मध्ये नोंद झाली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने सोमवारी या केक ड्रेसचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओला 68,000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.


131 किलो वजनाचा केक ड्रेस बनवला कसा?


केकचा खालचा भाग अॅल्युमिनियम फ्रेम आणि दोन मेटल बोल्ट वापरून बनवण्यात आला आहे. याला फ्रॉकच्या घेरचा आकार देण्यात आला असून केक बेस आणि क्रीम पासून हा ड्रेसच्या आकाराचा भव्य केक तयार करण्यात आला. विशेष म्हणजे या केकचा साचा तयार करुन मॉडेल या साच्यामध्ये जाते आणि हा केकचा ड्रेस परिधान करते असे व्हिडिओत दिसत आहे. 


गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विक्रम करण्यासाठी, केक ड्रेसचे वजन किमान 68 किलो असणे आवश्यक आहे आणि ते परिधान केलेल्या मॉडेलने किमान पाच मीटर चालणे आवश्यक आहे. मात्र, हा केक ड्रेस 131 किलो वजनाचा आहे. हा केक ड्रेस घालून मॉडेल पाच मीनिट वॉक देखील करते. या केकचे प्रदर्शनात आलेल्या सर्वांना वाटप करण्यात आले. अनेकजण केकच्या ड्रेसमधून केक कटरताना देखील व्हिडिओमध्ये दिसत आहेत.