Bangladesh Bus Accident: बांगलादेशमध्ये (Bangladesh) भीषण बस अपघात झाला आहे. या अपघातात 16 प्रवासी ठार झाले असून 30 जण जखमी झाले आहेत. ढाक्यामधील (Dhaka) ही बस ब्रीजवरुन खाली कोसळून हा अपघात झाला. मदरीपूर (Madripur) येथील कुतुबपूर परिसरात हा अपघात झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्यास सुरुवात केली होती. शिबचर हायवे पोलीस स्थानकाचे अबु नयीम मोहम्हम मोफजील हक यांनी बचावकार्य सुरु असल्याची माहिती दिली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 



चालकांचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान मदरीपूरचे पोलीस अधिक्षक मोहम्मह मौसाद आलम यांनी जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली आहे.