मुंबई  : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. अचानक आलेल्या या महामारीमुळे हजारो लोकांचे प्राण गेले आहे. तर संपूर्ण जगात ७ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हा आजार कशामुळे पसरतो, आजाराची लक्षणं काय आहेत याची कल्पना संपूर्ण जगाला आहे. पण गेल्या काही दिवसात असं काही घडलं आहे ज्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मृतदेहाच्या संपर्कात आल्यामुळे एका कुटुंबातील १७ जणांना कोरोनाची लागण झाली. सर्वात आधी कुटुंबातील एका स्त्रीला कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१३ मार्च रोजी आपल्या काकीच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेली ६५ वर्षीय वृद्ध महिला आजारी पडली .  अंत्यसंस्कारानंतर घरी परतल्यानंतर मिडलँड्समधील ६५ वर्षीय वृद्ध महिलेला बर्मिंघॅमच्या क्वीन एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आले.  रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 



तिच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या १६ लोकांमध्ये देखील कोरोनाची लक्षणं आडळून आली. ज्यामध्ये कोरोनामुळे मृत पवलेल्या महिलेचे पती, मुलगी, भाची, काका आणि अन्य व्यक्तींचा देखील समावेश आहे. तर कोरोनाची लागण मृतदेहामुळे नाही तर त्यांनी घातलेल्या कपड्यांमुळे होत असल्याचं सिद्ध झालं आहे. 


सध्या यूके मध्ये जवळपास २० हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर येणाऱ्या काळात ही  संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.